Homeताज्या बातम्याशहरं

फलटण शहरात विनामास्क फिरणार्‍यांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा

फलटण / प्रतिनिधी : फलटण शहरामध्ये विनामास्क फिरणार्‍यांवर नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी

25 वर्षाच्या युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून
नगरविकास आराखड्या विरोधात मेढ्यात शेतकर्‍यांचे आंदोलन; प्रास्तावित आराखडयाची होळी
वाचकांकडून वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान

फलटण / प्रतिनिधी : फलटण शहरामध्ये विनामास्क फिरणार्‍यांवर नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड व पोनि भारत किंद्रे प्रत्यक्ष रस्त्यांवर उतरुन संयुक्तपणे कारवाई करत असून आतापर्यंत 23 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने फलटण नगरपरिषद व फलटण शहर पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यताने सलग दुसर्‍या दिवशीही शहरातील मुख्य चौकांमध्ये नाकेबंदी करत, विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. प्रशासनाने आतापर्यंत 23 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे.
फलटण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गिरवी नाका, बाजारपेठ या ठिकाणी नाकेबंदी विनामास्क फिरणार्‍या नागरिकांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच मास्क घालणे बंधनकारक असल्याची समज देत नागरिकांना मास्कचे वाटप केले जात आहे. बाजारपेठेत व मुख्य चौकामध्ये विनामस्क फिरणार्‍या 55 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून 11 हजार रुपये दंड वसूल केला आहे. प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने नागरिक ही आता नियमांचे काटेकोरपणे पालन करु लागले आहेत.

COMMENTS