कोयनानगर / वार्ताहर : कोयना धरण परिसर शनिवारी दुपारी भूकंपाच्या धक्क्याने हादरला. शनिवारी दुपारी 2.14 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का या परिसरात बसला. भूक
कोयनानगर / वार्ताहर : कोयना धरण परिसर शनिवारी दुपारी भूकंपाच्या धक्क्याने हादरला. शनिवारी दुपारी 2.14 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का या परिसरात बसला. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैॠत्येस 6 किमी अंतरावर आहे. 8 जानेवारी रोजी दुपारी 2.14 ला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपाच्या धक्क्याची खोली 4 होती. या भूकंपाच्या धक्क्याच्या केंद्रबिंदूचे अंतर कोयना धरणापासून जवळच हेळवाक गावाच्या नैऋत्येस 6 किमी होते. हा धक्का कोयना परिसरात जाणवला आहे. या धक्क्यामुळे पाटण तालुक्यात कुठेही हानी झाली नसल्याचे तहसीलदार रमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
COMMENTS