Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूर पालिकेची 3 जानेवारीची सभा रद्द

राष्ट्रवादीच्या तक्रारींनंतर जिल्हाधिकार्‍यांचा निर्णयइस्लामपूर / प्रतिनिधी : नगरपालिकेत येत्या तीन तारखेला बोलावलेली सभा बेकायदेशीर असल्याने ती

थकबाकीपोटी महावितरणच्या सबस्टेशनला मसूर ग्रामपंचायतीने सिल ठोकताच पाणी पुरवठा सुरळीत
कोल्हापूर सर्किट बेंचबाबत मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा करणार : मुख्यमंत्रीे
आक्षेपार्ह भाषण केल्याबद्दल भाजपच्या नेत्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादीच्या तक्रारींनंतर जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय
इस्लामपूर / प्रतिनिधी : नगरपालिकेत येत्या तीन तारखेला बोलावलेली सभा बेकायदेशीर असल्याने ती रद्द करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसने आव्हान दिले होते. जिल्हाधिकार्‍यांकडे त्याबाबत तक्रार केली होती. त्यावर जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय दिला.
इस्लामपूरचे ईश्‍वरपूर नामकरण करण्यासंदर्भात शिवसेना आक्रमक असून आनंदराव पवार यांच्या मागणीनुसार पुन्हा एकदा सभा बोलावण्यात आली होती. त्यानुसार 3 जानेवारीला सभा घेण्याची नोटीस काढली होती. 27 डिसेंबर रोजी झालेल्या नगरपालिकेच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस व विकास आघाडीच्या काही नगरसेवकांनी दांडी मारल्याने सभा गणपूर्तीअभावी रद्द करण्यात आली होती. सात दिवसांची मुदत पूर्ण झाल्याशिवाय दुसरी सभा घेता येत नाही. सदस्यांना किमान सात दिवस आधी नोटीस द्यावी लागते. त्या तारखेपासून सभेच्या तीन तारखेपर्यंत सात दिवस पूर्ण होत नसल्याने ही सभा बेकायदेशीर आहे, असा पवित्रा राष्ट्रवादीने घेतला होता.
ईश्‍वरपूर नामकरण विषयाबरोबर अन्य विषय अजेंड्यावर घेण्यात आले होते. कायद्यानुसार सात दिवसांच्या अटींची पूर्तता होणार नसल्याने सभेचा विषय निकाली निघाला आहे. दरम्यान, स्थायी समितीची बैठक बोलावण्यात आली होती. कायद्यानुसार ही बैठक होऊ शकते. परंतू या बैठकीलाही गणपूर्तीचा विषय आडवा येऊ शकतो. दहापैकी पाच सदस्य हजर राहणे आवश्यक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बैठकीला हजर राहण्याची शक्यता कमी असल्याने बैठक होईल की नाही याबाबत साशंकता आहे.
4 जानेवारीपासून प्रशासक
चार जानेवारीपासून इस्लामपूर नगरपालिकेत विद्यमान पदाधिकार्‍यांची सत्ता संपुष्टात येत आहे. त्यामुळे नंतरचा कारभार प्रशासकाकडे जात आहे. मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्याकडे प्रशासक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

COMMENTS