इस्लामपूर / प्रतिनिधी : गावच्या सर्वांगीण विकासात सरपंचांची भूमिका महत्त्वाची आहे. सकारात्मक वृत्ती, लोकसहभाग आणि सामान्यांच्याकडून काम करून घेण्याची
इस्लामपूर / प्रतिनिधी : गावच्या सर्वांगीण विकासात सरपंचांची भूमिका महत्त्वाची आहे. सकारात्मक वृत्ती, लोकसहभाग आणि सामान्यांच्याकडून काम करून घेण्याची क्षमता असल्यास गावे नव्याने उभा राहू शकतात, असा विश्वास पाटोदाचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी व्यक्त केला. स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा, वृक्षारोपण, वृक्षांचे संवर्धन, सामाजिक एकोप्यावर गावा-गावात कामे व्हायला हवीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
साखराळे (ता. वाळवा) येथे स्वातंत्र्य सेनानी शामराव पाटील यांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्यसेनानी शामराव पाटील लोकविकास मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सरपंच बाबुराव पाटील, उपसरपंच तजमुल चौगुले, पोलीस पाटील आनंदराव दवणे, कृष्णा उद्योग समूहाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, रामराजे विजयराव पाटील, लोकविकास मंडळाचे अध्यक्ष जयकर पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
पेरे-पाटील म्हणाले, पाटोदा गावाने केलेला विकास हा संपूर्ण महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या नकाशावर उठून दिसणारा ठरला आहे. आपल्या माणसाला सोबत घेऊन जाण्याचा आग्रह जर प्रत्येकाने धरला, तर निश्चितच गावांचा कायापालट होऊ शकतो. ग्रामीण भागातील विकास हा शहराला लाजवण्यासारखा विकास होईल. यामध्ये सहकार खूप महत्त्वाचा ठरत आहे. साखराळे गावचे प्रथम सरपंच स्वातंत्र्यसेनानी शामराव पाटील यांनी स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कार्याबद्दल त्यांनी यावेळी गौरवोद्गार काढले.
प्रारंभी जवाहर सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. सुरज चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विजय रामचंद्र पाटील यांनी आभार मानले. अमोल पाटील, टी. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी श्रीकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमोल कुंभार, अभय पाटील, निरंजन पवार, अभिजीत डांगे, विश्वजीत पाटील, विशाल माने, ऋतुराज पाटील, किरण पाटील, सचिन पाटील, तानाजी पाटील, प्रताप सवाखंडे यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
23-5
साखराळे : स्व. शामराव पाटील (आण्णा) यांच्या स्मरणार्थ व्याख्यानमध्ये बोलताना राष्ट्रीय पुरस्कार विजेते सरपंच भास्करराव पेरे-पाटील.
COMMENTS