Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी विरोधात सर्वाना बरोबर घेऊन आगामी निवडणूका लढविणार : निशिकांत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : महापुरातील फसवी घोषणा, कोरोनातील अपयश, वाढती भ्रष्टाचारवृत्ती, साखर कारखानदारांचे एफआरपीबाबत मौन यामुळे शेतकर्‍यांसह सर्व

सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनचे कराड बस स्थानकासह कॉटेज हॉस्पिटलमध्ये उद्घाटन
खानापूर तालुक्यातील 8 ग्रामपंचायती बिनविरोध; 37 गावात काट्याची टक्कर
तन्मय कुंभार याची एअर पिस्तुल खेळामध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

इस्लामपूर / प्रतिनिधी : महापुरातील फसवी घोषणा, कोरोनातील अपयश, वाढती भ्रष्टाचारवृत्ती, साखर कारखानदारांचे एफआरपीबाबत मौन यामुळे शेतकर्‍यांसह सर्व स्तरातील लोकांची महाविकास आघाडी सरकारकडून पुर्णता फसवणुक झाली आहे. सांगली जिल्ह्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. आगामी नगरपालिका व जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी विरोधात सर्वाना बरोबर घेऊन लढत द्यावी, असे आवाहन उरूण-इस्लामपूरचे नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.
इस्लामपूर, आष्टा नगरपालिका व जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने विचार जाणून घेण्यासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकित ते बोलत होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कोणाची जिरविण्यासाठी लढायची नाही. आजच्या तरुण पिढीला चांगला विचार व दिशा मिळावी म्हणून लढायची आहे. आज ही शहरातील 3600 लोक कच्च्या घरात रहातात हि प्रगती व विकास आहे का? असा सवाल करत हि राजकीय व्यवस्था बदलण्यासाठी आपण निवडणूक लढवायची आहे. सर्वानी एकदिलाने कामाला लागा. हि निवडणूक स्वत:ची लढाई समजुन लढा विजय निश्‍चित आपला आहे.
यावेळी वाळवा तालुका भाजपा अध्यक्ष धैर्यशील मोरे, भाजपा युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप सावंत, भाजपा शहर अध्यक्ष अशोकराव खोत, एस. के. पाटील, पोपट शिंदे, शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्थाविक वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी बागणीचे सरपंच संतोष घनवट, माजी सरपंच बबन शिंदे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय हवलदार, संजय पोरवाल, वाळवा तालुका भाजपा महीला आघाडीचे अध्यक्ष सुरेखाताई जगताप, प्रांजली अर्बन निधी बॅकेचे उपाध्यक्ष राहुल पाटील, नगरसेविका मंगल शिंगण, निवास पाटील, भाजपा वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ. राहुल नाकील, भवानीनगरचे माजी सरपंच दादासाहेब रसाळ, गजानन पाटील, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण माने, वाळवा तालुका भाजपाचे उपाध्यक्ष निवास पाटील, शरद पाटील, आष्टा भाजपा शहर अध्यक्ष उदय कवठेकर, माणिक आवटी, आबा मोरे, स्वप्नील मोरे, प्रविण परीट, शरद अवसरे, माणिक पाटील, बंडा पाटील, मनोज मगदुम, रणजीत माने, सचिन जगदाळे, अनिल सरदेशमुख, दिनकर कोळेकर, अक्षय कोळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
इस्लामपुरात पुन्हा सत्ता तर आष्ट्यात बदल घडवू
इस्लामपूर शहराचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलण्यात यश आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा शुभोभिकरण, भुयारी गटर योजना, रस्ते, गटारी, समाज मंदिरे भाजी मार्केट, ट्रॉफिक सिग्नल, रस्ता रुंदीकरणाची कामे पुर्णत्वाकडे गेली आहेत. अनेक घरकुल मिळाले, अनेक योजना राज्य शासन स्तरावर मंजुरीसाठी पाठविल्या आहेत. यामुळे मतदार पुन्हा सत्ता देतील यात शकां नाही तर आष्टा नगरपालिकेत समविचाराच्या लोकांना बरोबर घेऊन सत्ताबदल घडवू, असा विश्‍वास निशिकांत पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS