कराड / प्रतिनिधी : देशात नैसर्गिक वायू इंधन देण्याचे नियोजित करण्यात आले असून त्याअंतर्गत प्रदूषण कमी करण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. यासाठी दे
कराड / प्रतिनिधी : देशात नैसर्गिक वायू इंधन देण्याचे नियोजित करण्यात आले असून त्याअंतर्गत प्रदूषण कमी करण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. यासाठी देशभरात विविध ठिकाणी नैसर्गिक वायूचा वापर, इंधनासाठी केला जाणार आहे. या भूमिकेतून कृष्णा कारखान्याचा सीएनजी पंप लवकरच कार्यान्वित होणार असून लोकांना याचा निश्चितपणे फायदा होणार आहे, असे प्रतिपादन कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी केले.
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंप परिसरात नव्याने उभारण्यात येणार्या सीएनजी गॅस पंपाचे भूमीपूजन कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक वसंतराव शिंदे, संजय पाटील, जे. डी. मोरे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, माजी पं. स. सदस्य संजय पवार, शेरेचे शंकर निकम पंच, पंकज पवार, बहेचे ग्रा. प सदस्य राजाराम थोरात, शशिकांत मोहिते, रणजित निकम उपस्थित होते.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने सीएनजी गॅस पंप उभारणीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सीएनजी हा इंधन प्रकार केवळ स्वस्त नसून स्वच्छ आणि सुरक्षित आहे. इतर इंधन प्रकाराच्या तुलनेत अधिक कार्यक्षम आहे. सीएनजी इंधनाची किंमत ही पेट्रोल व डिझेलपेक्षा खूप कमी असल्याने आणि किंमतीच्या तुलनेत मिळणारे मायलेज हे आकर्षक असल्याने लोकांना याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. लवकरच कारखान्याचा सीएनजी पंप कार्यान्वित होणार आहे, अशी ग्वाही डॉ.अतुल भोसले यांनी दिली.
यावेळी सेक्रेटरी मुकेश पवार, चीफ इंजिनिअर सुहास घोरपडे, फायनान्स मॅनेजर जयेंद्र नाईक, प्रोसेस मॅनेजर डी. जि. देसाई, असी. जनरल मॅनेजर डिस्टलरी प्रतापसिंह नलवडे, को-जन मॅनेजर गिरीश इस्लामपूरकर, सिव्हील इंजिनिअर प्रशांत नागटिळक, लेबर अॅण्ड वेल्फेअर ऑफिसर अरुण पाटील, कार्यालयीन अधीक्षक निलेश देशमुख, स्टोअर ऑफिसर गोविंद मोहिते, वाहतूक अधिकारी गजानन प्रभूणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल निकम यांच्यासह ऊस वाहतूकदार, कर्मचारी उपस्थित होते.
ऊस वाहतुकदारांची होणार बचत
शेती आणि शेतीपुरक व्यवसाय करणार्या शेतकरी व ऊस वाहतूकदारांना जास्तीत-जास्त मोबदला देण्याची व सहकार्य करण्याची भूमिका कृष्णा कारखाना नेहमी घेतो. त्या उद्देशाने वाहनांमध्ये विकसित झालेली नवनविन टेक्नॉलॉजी स्वीकारत कारखाना प्रशासन ऊस वाहतूक खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने सीएनजी वापरून ऊस वाहतूकदारांच्या खर्चात बचत करण्याचा प्रयोग येत्या काळात कारखाना करणार आहे.
COMMENTS