वाघाला पकडणे सोपे , पण माकडाला पकडणे अवघड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाघाला पकडणे सोपे , पण माकडाला पकडणे अवघड

कोपरगाव / ता.प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील करंजीकरांना  कोणाची दहशत आहे असं म्हणणं हे खरंतर धाडसाचं ठरेल. पण गेल्या काही दिवसांत खरंच करंजीकरांनी द

दस्त नोंदणी कार्यालये आज व उद्या राहणार सुरू ; शास्ती कमी झाल्याने निर्णय
स्वीस महिला अभ्यास मंडळाची ‘ ध्रुव’ भेट ; सर्जनशील अभ्यास पद्धतीचे कौतुक
ऊस बेणे विक्रीसाठी ‘सोशल मिडीया’चा वापर | आपलं नगर | LokNews24 |

कोपरगाव / ता.प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील करंजीकरांना  कोणाची दहशत आहे असं म्हणणं हे खरंतर धाडसाचं ठरेल. पण गेल्या काही दिवसांत खरंच करंजीकरांनी दहशत घेतली आहे, तीही एका माकडाची. गेल्या दिड महिन्या पासुन एक माकड गावात आले सुरुवातीला मर्कट लिला हव्याहव्याशा वाटल्या ग्रामस्थांकडून वेगवेगळ्या प्रकारची फळे खान्यास मिळाल्याने माकडाने मुक्काम वाढवित आपल्या खोड्या दाखविण्यास सुरुवात केली त्याच्या तावडीतुन ग्रामस्थांसह विद्यार्थी ,शिक्षकही सुटले नसल्याने  मोठी दहशत पसरली या माकडाला ग्रामस्थांच्या मागणी वरुन पकडण्यासाठी वन कर्मचारीही जेरीस आले असुन एकवेळ वाघ पकडणे सोपे पण माकड पकडणे अवघड अशी म्हणन्याची वेळ त्यांच्यावर आली असुन या माकडाला पकडण्यासाठी विशेष पथक पाचारण करुन बंदोबस्त करावा अशी मागणी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे. लाल रंग पाहीला की माकड चवताळते व त्या व्यक्तीच्या मागे लागते यातुन लाल रंगाच्या दुधाच्या किटल्या घेऊन जाणारे दुध उत्पादकही सुटले नाही.    माकडाला पकडणारे वन कर्मचारी  परिसरात दाखल झाले तर सावध झालेले माकड झाडावर एवढ्या उंचीवर जाऊन बसते की खाली येत नाही एक महिन्या पासुन पिंजराही लावला त्याचाही काहीच उपयोग होईना या माकडावर लक्ष ठेवण्यासाठी  गावात एक कर्मचारीही तैनात केलेला आहे , शेतशिवारात माकडाने उच्छाद मांडला. त्यांच्या मर्कटलिलांनी अक्षरश: जेरीस आलेल्या लोकांनी काहीही करा आपल्याला जमत नसल्यास   वरिष्ठांना अहवाल पाठवून विशेष टिम बोलवा  पण माकडाचा बंदोबस्त लावण्याची मागणी केली. परंतु वनविभाग उडवाउडविची उत्तरे देऊन ग्रामस्थांच्या मागणीकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप करंजी ग्रामपंचायतचे उपसरपंच रविंद्र आगवण यांनी करत एख्याद्या विद्यार्थ्यांचा ,ग्रामस्थाचा जीव गेल्यावर या माकडाला पकडणार का ? असा संतप्त सवाल करत लवकरात लवकर या माकडाला वनविभागाने पकडावे अशी मागणी  केली आहे तर शाळेच्या मुख्याध्यापकांनीही वन विभागाला माकड पकडण्याची लेखी पञ देऊन विनंती केली आहे.  

COMMENTS