कर्जत:- कर्जत नगर पंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने देखील प्रस्थापितांच्या दबावाला न जुमानता निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.निवडणुकीत सर्व बलाढ्
कर्जत:- कर्जत नगर पंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने देखील प्रस्थापितांच्या दबावाला न जुमानता निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.निवडणुकीत सर्व बलाढ्य पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने वंचित शोषितांवर दबाव आणून त्यांना पैश्याचे आमिष दाखवून विकत घेऊ शकते परंतु कर्जत नगर पंचायत मतदानासाठी सुज्ञ नागरिक असल्याने यावेळी ते कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाही.वंचित बहुजन आघाडी शिवाय कर्जत नगर पंचायत सत्ता प्रस्थापित पक्ष काबीज करू शकत नाही, वेळ पडली तर वंचित बहुजन आघाडी जश्यास तसे उत्तर देईल असा इशारा जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज,फुले, शाहू, आंबेडकर,अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या विचारधारेवर चालणाऱ्या वंचित बहुजन आघाडी चे अधिकृत उमेदवार सोमनाथ हरी भैलुमे यांनी प्रभाग ९ स्वामी समर्थ नगर सर्वसाधारण मतदारसंघ,अनिल विश्वनाथ समुद्र प्रभाग १५ भवानीनगर सिद्धार्थ नगर अनूसुचित जाती मतदारसंघ आणि निर्मला दिपक भैलुमे प्रभाग १६ आक्काबाईनगर अनुसूचित जाती स्री राखीव मतदारसंघ मधून वंचित बहुजन आघाडीचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवीत आहेत. वक्फ जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तौसीफ शेख यांनी लोकशाही पद्धतीने वेगवेगळी आंदोलने केली परंतु त्यांच्या आंदोलनाला प्रशासन कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता त्यासही वेळेत कोणता प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी मुस्लिम समाजाच्या हितासाठी जीवाची पर्वा न करता स्वतःला संपवून टाकले त्यांच्या या बलिदानाला वंचित बहुजन आघाडी कधीच विसरणार नाही आणि व्यर्थ ही जाऊ देणार नाही, तौसीफ शेख कायम स्मरणात राहवे यासाठी त्यांच्या स्मरणार्थ अभ्यासिका केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडे पाठपुरावा करून वक्फ बोर्डाच्या जमिनीवर व्यापारी संकुल उभारून ते छोट्या मोठया व्यापाऱ्यांना भाडे तत्वावर देऊन त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा पैसा अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षणसाठी व युवकांच्या रोजगारासाठी खर्च करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असून, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजने अंतर्गत रस्ते, पाणी, आदीसह तसेच सर्व सामान्य जनतेच्या अपेक्षा लक्षात घेऊन दैनंदिन वीज पुरवठा सुरळीत करणार, शुद्ध फिल्टर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी सोडवणार, बेघराना म्हाडा योजना अंतर्गत घरकुल योजना मिळवून देणार,महापुरुषांच्या नावाने चौक सुशोभीकरण करण्यात येणार,सार्वजनिक ठिकाणी स्रीयांकरीता स्वतंत्र व पुरुषांकरीता स्वतंत्र स्वच्छालय निर्माण करणार,अंध,अपंग आणि बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार,नगरपंचायत महीला आणि पुरुष सफाई कामगार कायम करुन घेणार,प्रत्येक सफाई कामगार हा विभागवार नियुक्त करणार आणि या माध्यमातून सफाईदार कामगारांची पिळवणूक थांबवण्यासाठी प्रयत्न त्यांना शासनाच्या नियमानुसार पगार वाढ करणार तसेच वाढीव सफाई कर्मचारी भरती करणार,प्रभाग निहाय स्वतंत्र गार्डन ची निर्मिती करणार. प्रभागात विनामूल्य मोफत स्वतंत्र डिझीटल प्रायमरी इंग्लिश स्कूल ची व्यवस्था करणार आहे. कर्जत नगर पंचायत निवडणुका मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान करून उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन जिल्हा संघटक प्रा.नंदकुमार गाडे यांनी केले.यावेळी जिल्हा महासचिव योगेश साठे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष गलांडे,चंद्रकांत डोलारे,सुरेश कोंडलकर,चंद्रकांत नेटके,तालुकाध्यक्ष सोमनाथ भैलुमे आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS