Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई महापालिकेची लढाई भाजपने जिंकली! ; स्थायी समितीतून काढण्याचा शिवसेनेचा निर्णय रद्द

मुंबई महापालिकेत सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणात आज शिवसेनेला धक्का बसला.

पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई l LokNews24
गोव्यात भरणार 58 वे प्रादेशिक स्तरीय टपाल न्यायालय
गोदावरीच्या उजव्या कॅनालमध्ये बुडून वृद्धाचा मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी: मुंबई महापालिकेत सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणात आज शिवसेनेला धक्का बसला. भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांना स्थायी समितीतून काढून टाकण्याचा महापालिका सभागृहाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. 

’नामनिर्देशित सदस्य असलेले भाजपचे नगरसेवक शिरसाट यांना मतदानाचा अधिकार नसून त्यांची नेमणूक ही कायद्याशी सुसंगत नाही. त्यामुळे त्यांना समितीवर राहता येणार नसल्याने अध्यक्षांनी निर्णय द्यावा’, अशी विनंती शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली होती. तेव्हा शिरसाट यांची नियुक्ती पालिका सभागृहाने केलेली असून कायदेशीरच आहे, असे म्हणणे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मांडले होते; मात्र या मुद्द्यावरून बराच वेळ गोंधळ सुरू राहिला. अखेर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शिरसाट यांचे सदस्यत्व रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याला शिरसाट यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले होते. 

COMMENTS