मध्य आणि उत्तर मुंबईत घरांना जादा मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मध्य आणि उत्तर मुंबईत घरांना जादा मागणी

मुंबई शहर व उपनगरात गेल्या सहा महिन्यांत 72 हजारांहून अधिक घरांची खरेदी झाली. त्यामध्ये सर्वाधिक मागणी मध्य व उत्तर उपनगरांत होती.

ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान
भिवंडीत इमारत कोसळून दोघांचा मृत्यू
झुंज दुर्घटनेतील ११ कुटुंबातील व्यक्तींना २२ लक्ष रुपयांची आर्थिक मदत

मुंबई/प्रतिनिधी : मुंबई शहर व उपनगरात गेल्या सहा महिन्यांत 72 हजारांहून अधिक घरांची खरेदी झाली. त्यामध्ये सर्वाधिक मागणी मध्य व उत्तर उपनगरांत होती. या भागात उभ्या होणार्‍या पायाभूत सुविधांमुळे ही मागणी वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे मुंबईत ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान 35 हजार तर त्यानंतर मार्चपर्यंत 72 हजारहून अधिक घरांची खरेदी झाली. 3 व 4 बीएचके फ्लॅट्सची विक्री दक्षिण मुंबईत तर 1 व 2 बीएचके घरांची प्रामुख्याने मध्य, ईशान्य व उत्तर उपनगरांत सर्वाधिक विक्री झाल्याचे दिसून आले. याबाबत रुणवाल ग्रुपचे कार्यकारी संचालक रजत रस्तोगी यांनी सांगितले, की पायाभूत सुविधांच्या घडामोडींमुळे मध्य उपनगरापासून नवी मुंबई, ठाणे, दक्षिण मुंबईसह पश्‍चिम उपनगरासारख्या इतर ठिकाणी संपर्क वाढला आहे. अव्वल दर्जाचे ब्रँड्स, हॉटेल्स, मॉल्स आणि रेस्टॉरंट्स आधी केवळ दक्षिण मुंबईत असायचे. ते आता मध्य मुंबईत उभे राहत आहेत. असे असले तरी तुलनेने गर्दी या भागात कमी आहे. मुंबईत विक्रोळी ते मुलुंड या उपनगरांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने सातत्याने बदल घडत आहे. पूर्व द्रूतगती मार्ग, जेव्हीएलआर व पूर्व मुक्त मार्ग यासारख्या पायाभूत सुविधा उभारणींचा या बदलांत मोठा भाग आहे. त्यामुळेच येथील घरांची मागणी वाढली आहे. मागील सहा महिन्यांत 72 हजार घरांपैकी 15 ते 18 हजार घरे याच भागात खरेदी झाल्याचे बांधकाम क्षेत्रातील प्राथमिक सर्वेक्षणात समोर आले आहे. यानुसारच उत्तर मुंबईदेखील घर खरेदीचे महत्त्वाचे ठिकाण ठरत आहे. दहिसर-डीएन नगर, डीएन नगर-मंडाले, जोगेश्‍वरी-कांजूरमार्ग या मेट्रो मार्गांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध उत्तर मुंबईशी आहे. त्यात भविष्यात दहिसर-भाईंदर मेट्रोने जोडले जाणार आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर कांदिवली, बोरिवली व दहिसर हे रिअल इस्टेटचे नवे विकासकेंद्र ठरत आहे. तेथेदेखील 12 ते 14 हजार घरांची खरेदी झाली आहे. ’या भागात नव्याने निवासी प्रकल्प उभे राहत आहेत. लवकरच पुढील पाच वर्षांत 1750 कोटी रुपयांचा महसूल निर्माण करणारा एकूण 10 लाख चौरस फूट क्षेत्रफळाचा महत्त्वाचा प्रकल्पदेखील बोरिवलीत येत आहे. अशा प्रकल्पांमुळे या भागाचे महत्त्व वाढते असेल’, असे मत सनटेक रिअ‍ॅल्टीचे अध्यक्ष कमल खेतान यांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS