सांस्कृतिक लढ्याची स्पष्टता

Homeताज्या बातम्यासंपादकीय

सांस्कृतिक लढ्याची स्पष्टता

यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चर्चेत न राहिल्यामुळे ओढून-ताणून वाद निर्माण करून संमेलनाची सकारात्मक नसली तरी नकारात्मक चर्चा  घडवून आणली जा

समृद्धीवर लवकरच ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम
भाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
अजित पवारांच्या अडचणीत वाढ; राज्य बँक घोटाळ्याची ’पीएमएलए’ कोर्टाकडून दखल

यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चर्चेत न राहिल्यामुळे ओढून-ताणून वाद निर्माण करून संमेलनाची सकारात्मक नसली तरी नकारात्मक चर्चा  घडवून आणली जात आहे. संमेलनाची चर्चा न होण्यात सर्वात महत्वपूर्ण बाब ठरतेय, बहुजनांची सांस्कृतिक जागृती! बहुजन समाज सामाजिक आणि राजकीय पलिकडे जाऊन सांस्कृतिकदृष्ट्या जागृत होत असल्याचं क्रांतिकारी लक्षण समाजात स्पष्ट होतेय. अशावेळी मात्र नेहमीप्रमाणे मा. शरद पवार यांनी सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांचा उल्लेख करून बहुजनांच्या सांस्कृतिक जागृती ला गालबोट लावले, असे आमचे मत बनले. काल कुबेरांच्या भाषणानंतर सोशल मिडीयावर टीकेची झोड सावरकरांच्या विरोधात उभी राहीली असताना शरद पवारांनी सावरकरांचा केलेला उल्लेख हा राजकीय मुत्सद्दीपणा वाटतो. एका बाजूला प्रस्थापित साहित्यिकांवर सावरकरांना साहित्य संमेलनात डावलल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. परंतु, पवार यांनी भाजप नसता वाद उठवत असल्याचे सांगून त्यांची नकारात्मक बाजू समोर आणली. मात्र, फडणवीस यांच्या आरोपातील दुसरी सत्यता अशी की, प्रस्थापित सारस्वत असणारे साहित्यिक देखील सावरकरांचा स्विकार करण्यास धजावत नाहीत! तथापि, कालपासून बहुजन बुध्दिजिवींनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एकूणच सर्व बाजूंवर टीकास्त्र सोडले आहे. अशावेळी, त्यांच्या वैचारिक बाजूला बळ द्यायला हवे. कारण यासर्व बाबींतून सांस्कृतिक संघर्ष ताकदवर होताना दिसतो.‌ या देशातील खरा संघर्ष हा सांस्कृतिक बाबीतच दडलेला असल्याने अशाप्रकारे दोन संस्कृतींचा संघर्ष उभा राहणे हे परिवर्तनाच्या दृष्टीने अतिशय जमेची बाजू म्हणता येईल. वास्तविक, नाशिकच्या साहित्य संमेलनात सावरकरांचा उल्लेख करायचे संमेलकारांनी टाळले, ही त्यांची मुळ भूमिका नसून एक मुत्सद्दीपणा आहे. राजकीय सत्ता ब्राह्मणी विचारांची असली तरी सध्या सावरकरांचा विचार हा सर्व ब्राह्मणेतर समाजाने नाकारल्याने सध्याचे ब्राह्मणी बुध्दिजिविंनी देखील कच खाल्ली आहे. त्यामुळेच संघाच्या आजूबाजूला गोंडा घोळणारे पत्रकार त्यांनी उपयोगात आणायचे ठरवले आहे. परंतु, जी गोष्ट आडात नसेल ती पोहऱ्याने काढताच येत नाही, या उक्तीप्रमाणे काही झाले तरी सावरकर स्विकारणे आता अवघड बनत चालले. जोपर्यंत संघविचारांच्या राजकीय सत्तेला पुरेसा कालावधी मिळाला नव्हता तोपर्यंत त्यांना काही प्रमाणात सत्ता संधी देण्याची मानसिकता होती. परंतु, गेली सात वर्षे देशाने संघविचारांच्या सत्तेचा घेतलेला अनुभव पाहता, सांस्कृतिक मतभेद आता वैचारिकदृष्ट्या स्पष्ट होताहेत, ही बाब स्वागतार्ह आहे. त्यामुळे, आम्ही मा. शरद पवार यांना सांगू इच्छितो की, या सांस्कृतिक लढ्यात त्यांनी बहुजनांच्या बाजूने उभे रहावे. अन्यथा, परिवर्तनाच्या क्रांतीत त्यांच्या नावाचा इतिहास नकारात्मक होईल.

COMMENTS