अनिलकुमार गायकवाड यांना ‘समृद्धी’साठी मुदतवाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिलकुमार गायकवाड यांना ‘समृद्धी’साठी मुदतवाढ

समृद्धी महामार्गाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणारा समृद्धी महामार्ग या प्रकल्पांसाठी अनिलकुमार बळीराम गायकवाड यांना सहव्यवस्थापकीय संच

आई-वडील दिव्यांग आहेत तर, जाणून घ्या आयकरात सूट कशी मिळवायची .
शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नवदुर्गाचा सत्कार
अत्याचार करणार्‍या नराधमांवर कठोर कारवाई करा

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणारा समृद्धी महामार्ग या प्रकल्पांसाठी अनिलकुमार बळीराम गायकवाड यांना सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातून प्रधान सचिव म्हणून गायकवाड सेवानिवृत्त झाले असले तरी, त्यांनी समृद्धीच्या सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले असल्याने हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्यांची आवश्यकता होती. गायकवाड यांची काम करण्याची असलेली हातोटी, स्वतःला झोकून देत काम पूर्ण करून घेण्यासाठीचे कसब अवगत असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा एक वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 2 डिसेंबर 2021 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत अनिलकुमार बळीराम गायकवाड यांची महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महत्त्वकांक्षी प्रकल्पात सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणारा हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे, महराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या महामार्गावरील वाहतूक सुरक्षेबाबतची कामे अंतिम टप्प्यात असून दुसर्‍या टप्प्याचे काम पुढील 1 वर्षात पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करावयाचे नियोजन आहे. हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याची निकड विचारात घेवून अनिलकुमार गायकवाड सेवानिवृत्त सचिव बांधकामे यांची सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. हे आदेश 2 डिसेंबर रोजी काढण्यात आलेले आहेत. दिवसेंदिवस सार्वजनिक बांधकाम विभागात कामाच्या गुणवत्तेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. पण अनिलकुमार गायकवाड हे सरकार कोणाचेही असो, त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा, कामाबाबत गुणवत्तेचा नेहमीच घेतलेला ध्यास, गुणवत्तेच्याबाबतीत कोणतीही तडजोड नाही, या त्यांच्या स्वभावगुणामुळे या महामार्गाला येणार्‍या काळात निश्‍चितच आणखी गती वाढेल, अशा प्रकारचा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी असोत, ना. अशोक चव्हाण असोत, ना. शिंदे असोत, कामाच्या गुणवतेबद्दल अनिल गायकवाड यांनी एक आपली चांगली प्रतिमा निर्माण केलेली आहे. त्यांच्या या नियुक्तीने समृद्धी महामार्ग गतीने होईल, फक्त गतीनेच होईल असे नाही तर गुणवत्ताही राखली जाईल, असा विश्‍वास व्यक्त होत आहे. आज देशाला अशा प्रकारच्या अधिकार्‍यांची गरज आहे की ज्यांना सामाजिक बांधिलकी आहे, आपण समाजाचे काही देणे लागतोय या भूमिकेतून अधिकारी दुर्मिळ होत असताना अनिल बळीराम गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी म्हणजे शासनाने घेतलेला हा खूपच महत्त्वाचा निर्णय आहे. शून्यातून विश्‍व निर्मिती करणे, गुणवत्तेबद्दल तडजोड न करणे अशाप्रकारचा त्यांचा स्वाभाव आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग पूर्ण होईपर्यंत त्यांची या प्रकल्पासाठी नियुक्ती असावी, असा आग्रह कर्मचार्‍यांकडून करण्यात येत होता. तसेच त्यांचे योगदान लक्षात घेऊन राज्य सरकारने त्यांची पुन्हा एकदा एका वर्षांसाठी नियुक्ती केल्याने समृद्धीच्या महामार्गाला गती मिळणार आहे, यात शंका नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

COMMENTS