भारताच्या अडचणी वाढल्या ;  ऋद्धिमान साहा दुखापतग्रस्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारताच्या अडचणी वाढल्या ; ऋद्धिमान साहा दुखापतग्रस्त

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला मो

जुनच्या मध्यावर पाणी परिषदेचे आयोजन : डॉ. भारत पाटणकर
माहिती अधिकारी पदी हेमंतकुमार चव्हाण रुजू
इस्लामपूरात 19 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रा : विजयबापू पाटील

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला मोठा धक्का बसला. भारतीय संघाचा यष्टिरक्षक ऋद्धिमान साहा दुखापतग्रस्त झाला असून तो मैदानावर आला नाही. त्याच्या जागी श्रीकर भरतने यष्टिरक्षणाची जबाबदारी घेतली. बीसीसीआयने सांगितले की, साहाला मानेचा त्रास आहे आणि त्यामुळेच शनिवारी तिसऱ्या दिवशी तो मैदानात उतरला नाही. बीसीसीआयने सांगितले की, वैद्यकीय पथक साहाची काळजी घेत आहे.

किवी संघ 296 धावांत गारद
भारतीय संघाला पहिल्या डावात 345 धावांवर रोखल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने धमाकेदार सुरुवात केली होती. न्यूझीलंडने काल एकही गडी न गमावता 57 षटकांमध्ये 129 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगलंच पुनरागमन केलं. भारतीय गोलंदाजांनी किवी संघाचा डाव 142.3 षटकांमध्ये 296 धावांवर रोखला. त्यामुळे टीम इंडियाला 49 धावांची नाममात्र आघाडी मिळाली आहे.

COMMENTS