67 व्या वर्षी 50 किलोमीटर सायकल प्रवास करून युवा पिढीला व्यायामाचा संदेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

67 व्या वर्षी 50 किलोमीटर सायकल प्रवास करून युवा पिढीला व्यायामाचा संदेश

कासेगाव (ता. वाळवा) येथील डॉ. अरुण शिंदे यांनी नव्या पिढीला व्यायाम व सायकलचे महत्व पटवून देण्यासाठी आपल्या 67 व्या वाढदिवसानिमित्त कासेगाव-कराड-कासेगाव असा सुमारे 50 किलोमीटरचा सायकल प्रवास केला.

अफगाणिस्तान, पाकिस्तानसह नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के
25 गोशाळेसाठी वर्धमान संस्कार धामकडून 25 लाखांची देणगी
अखेर मुहूर्त ठरला; 7 मे पासून आष्टी ते अहमदनगर रेल्वे होणार सुरू

इस्लामपूर / प्रतिनिधी : कासेगाव (ता. वाळवा) येथील डॉ. अरुण शिंदे यांनी नव्या पिढीला व्यायाम व सायकलचे महत्व पटवून देण्यासाठी आपल्या 67 व्या वाढदिवसानिमित्त कासेगाव-कराड-कासेगाव असा सुमारे 50 किलोमीटरचा सायकल प्रवास केला. आजच्या वाढदिवसाच्या महागड्या पार्ट्या व डिजिटल बॅनरच्या जमान्यात त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक व स्वागत करण्यात आले.

कोरोनाच्या संकटाला समर्थपणे तोंड द्यायचे असेल तर प्रत्येकाला आपली प्रतिकार शक्ती वाढवावीच लागेल. त्यासाठी व्यायामास पर्याय नाही. हा संदेश देण्यासाठी डॉ. शिंदे यांनी हा उपक्रम राबविला आहे. त्यांच्यासमवेत कायम सायकलचा वापर करणारे वाटेगाव येथील बने ट्रस्टचे सचिव जयवंत पवार (वय 65), इंजिनिअरिंगचा विद्यार्थी कु. साहिल रज्जाक मुल्ला हे दोघे होते. त्यांनी सकाळी 6 वाजता सायकलिंग सुरू केले. ते सव्वा दोन तासात परत आले. त्यांनी 10 वर्षांपूर्वी आपल्या 57 व्या वाढदिवसानिमित्त कासेगाव- कराड असा पायी प्रवास केला होता. 

डॉ. शिंदे हे गेल्या 25-30 वर्षा पासून नियमितपणे चालणे, सायकल, योगा करत आहेत. त्यांचे मूळगाव कराड असून त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक व सिनेस्टार होते. ते गेल्या 40 वर्षापासून कासेगाव येथे सेवाभावी वृत्तीने वैद्यकिय सेवा करत आहेत. ते सध्या वाटेगाव येथील बने हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी आहेत. सरळ व विनोदी स्वभावाच्या काकांनी स्व. बाळ कासेगावकर नाट्य मंडळाच्या माध्यमातून नाटकात भूमिका केल्या आहेत. ते जयंत सार्वजनिक वाचनालयाचे बरीच वर्षे कार्याध्यक्ष होते. इस्लामपूर येथील नाट्य परिषद, कासेगाव मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातूनही ते कार्यरत आहेत.

COMMENTS