Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थंडीच्या काळात लहान मुलांतील श्‍वसनविकार बळावण्याचा धोका

नवी दिल्ली : दिवाळीनंतर दिल्ली शहर परिसरात कुंद वातावरण आहे. धूर व धुके यांचे मिश्रण (स्मॉग) हवेत भरून राहिल्याने डोळ्यांची जळजळ, श्‍वास घेण्यास

पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी फलटण नगरी सज्ज
सांगली जिल्ह्यातून राज्यात गांजासह अंमली पदार्थ पुरवण्याचे काम
माण तालुक्यातील मागील पाणी टंचाईतील टँकरची बिले थकली

नवी दिल्ली : दिवाळीनंतर दिल्ली शहर परिसरात कुंद वातावरण आहे. धूर व धुके यांचे मिश्रण (स्मॉग) हवेत भरून राहिल्याने डोळ्यांची जळजळ, श्‍वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या दिल्लीकरांना भेडसावत आहेत. लहान मुलांचे तर आरोग्यच धोक्यात आले असून तिघामागे एका बालकाला अस्थमा व गंभीर श्‍वसनविकार घेऊनच पुढचे आयुष्य काढावे लागणार आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला.
भारतातील सर्वांत 10 प्रदूषित शहरांत उत्तर प्रदेशातील 5 शहरांचा समावेश आहे. जगातील सर्वांत घातक 10 प्रदूषित शहरांत दिल्ली ‘टॉप’’ला असण्याचे गेल्या काही वर्षांपासून आहे. राज्य व केंद्र सरकारच्या टोलवाटोलवीत दिल्लीकरांचा जीव पणाला लागल्याबद्दल पर्यावरण तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाशी संबंधित ‘आयक्यू-एयर’ या गटाने जी नवी यादी जारी केली त्यात दिल्लीनंतर मुंबई, कोलकत्ता या शहरांचाही त्यात समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS