Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी आंदोलनात ठिणगी; इस्लामपूर डेपोतून वाटेगावला निघालेली एसटी बस अज्ञातांनी फोडली

इस्लामपूर / प्रतिनिधी : संपूर्ण महाराष्ट्रात एसटीचा संप सुरू असताना वाळवा तालुक्यातील इस्लामपूर आगारातून वाटेगाव, ता. वाळवा येथे गेलेल्या एसटीला

पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस अधीक्षकांकडून श्रध्दांजली
कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे 10 तारखेला उपोषण : अशोकराव पाटील
प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांचा वारणावती येथील वन्यजीव कार्यालयावर मोर्चा

इस्लामपूर / प्रतिनिधी : संपूर्ण महाराष्ट्रात एसटीचा संप सुरू असताना वाळवा तालुक्यातील इस्लामपूर आगारातून वाटेगाव, ता. वाळवा येथे गेलेल्या एसटीला अज्ञात व्यक्तींनी फोडण्याचे कृत्य केले आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच कासेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एसटी चालक व वाहकांनी याबाबत कासेगाव पोलिसांना माहिती दिली. एसटी फोडल्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असून आंदोलनाची ही ठिणगी पडली आहे. अज्ञाताविरोधात कासेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. इस्लामपूर आगारातून वाटेगाव, ता. वाळवा येथे वाहक मनोज देसाई व ए. बी. देसाई या एसटी कर्मचार्‍यांनी इस्लामपूरमधून दुपारी सव्वा दोनच्या सुमारास एसटी वाटेगावला रवाना केली. साडेतीनच्या सुमारास वाटेगाव येथील मुख्य चौकात आल्यानंतर चार अज्ञात इसमांनी तोंडाला रुमाल बांधून एसटी बसवर हल्ला केला. यात एसटीचे नुकसान झाले.
महाराष्ट्रामध्ये एसटी आंदोलनाचा प्रश्‍न चिघळत चालला आहे. महिला कर्मचार्‍यांसह एसटी आगारामध्ये तळ ठोकून आहेत. काही कारवाईच्या भीतीने कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी न होता एसटी सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. तालुक्यातील इस्लामपूर येथील आगारात गेल्या पाच दिवसांपासून एसटीचे विलीणीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. परंतू, आज दुपारी अचानक इस्लामपूर ते वाटेगावकडे जाणारी एसटी बाहेर पडली. त्यामुळे आंदोलक कर्मचार्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. शासनाच्या निलंबनाला घाबरून कर्मचार्‍यांनी असा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु आहे.

COMMENTS