अहमदनगर/प्रतिनिधी : लोकसहभागातून ग्रामविकासाचे मॉडेल आदर्शगाव हिवरेबाजारच्या (ता. नगर) रुपाने जगासमोर मांडणारे आदर्शगाव योजना कार्य समितीचे अध्यक्ष प
अहमदनगर/प्रतिनिधी : लोकसहभागातून ग्रामविकासाचे मॉडेल आदर्शगाव हिवरेबाजारच्या (ता. नगर) रुपाने जगासमोर मांडणारे आदर्शगाव योजना कार्य समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराचा गौरव बुधवारी (10 नोव्हेंबर) हिवरे बाजार ग्रामस्थांच्यावतीने सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
हिवरे बाजार गावाचेच नव्हे तर नगर जिल्ह्याचे भूषण मानले जात असलेल्या पोपटराव पवारांसह अकोल्याच्या बीजमाता राहीबाई पोपेरे व निवृत्त क्रिकेटपटू जहीर खान या तिघा जिल्हावासियांना मागील वर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र, कोरोनामुळे या पुरस्कारांचे वितरण झाले नव्हते. सोमवारी दिल्लीत पोपटराव पवार व राहीबाई पोपेरे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदा सात मान्यवरांचा ’पद्म विभूषण’, 10 मान्यवरांचा ’पद्मभूषण’ आणि 102 जणांचा ’पद्मश्री’ पुरस्कारासहीत गौरव करण्यात आला आहे. तर 16 जणांना मरणोत्तर ’पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील हिवरे बाजार या छोट्याशा खेडेगावाचे नाव जागतिक पातळीवर पोहचविणारे पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने गावाचाही लौकिक वाढला आहे. त्यामुळे गावातील पद्मश्री पोपटराव पवार मित्रमंडळाच्या पुढाकाराने पद्मश्री सत्कार सोहळा बुधवारी सायंकाळी 5 वाजता होणार असून, यावेळी पोपटराव पवार यांचा गावकर्यांच्यावतीने सन्मान केला जाणार आहे. या सत्कारासाठी येताना कोणीही पुष्पगुच्छ आणू नयेत तर पुस्तक घेऊन यावे व कोरोना नियमांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS