धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेले गुरु बिरोबा आणि शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा अनोखा सोहळा शुक्रवारी मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे पार पडला.याव
धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेले गुरु बिरोबा आणि शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा अनोखा सोहळा शुक्रवारी मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे पार पडला.यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडू व गोवा या राज्यातून लाखोंच्या संख्येने धनगर बांधव जमा झाले होते.
. 12 व्या शतकापासून चालत आलेली ही परंपरा दिवाळी पाडव्याच्या आमावस्याच्या दिवशी दुपारी 4 च्या दरम्यान पार पडते.या अनोख्या भेटीचा सोहळात हुनुर चा बिरोबा, शिरडोणची सिलवंती,
येणकीचा जकराया, सोन्याळचा बिरोबा, बिजर्गीचा बुळापा, उटगीचा ब्रह्मदेव, करामीचा बरागसिद्ध व महालिंगराया यांचा लाखोच्या साक्षीने भेटीचा सोहळा हुलजंतीच्या ओढ्याकाठी पाण्यात पार पडला.
-यावेळी –नगारा, ढोल यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.याप्रसंगी आ.समाधान आवताडे, सोमनाथ आवताडे, सिद्धेशवर आवताडे, येताळा भगत, अंबादास कुलकर्णी, सभापती सुधाकर मासाळ यांची उपस्थित होते.यात्रा काळात मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावला होता.
COMMENTS