Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संप मागे घेण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई / प्रतिनिधी : राज्य परिवहन महामंडळाचा राज्य शासनामध्ये सहभाग करून घ्यावा ही मागणी घेऊन राज्यातील एसटी कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून वेगवेळ्य

कोरिया रिपब्लिकची अंतिम फेरीत धडक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती; राज्य निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय
‘काळू-बाळू’सह 6 मातब्बरांचे तमाशाचे फड बंद

मुंबई / प्रतिनिधी : राज्य परिवहन महामंडळाचा राज्य शासनामध्ये सहभाग करून घ्यावा ही मागणी घेऊन राज्यातील एसटी कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून वेगवेळ्या पध्दतीने आंदोलन करत आहेत. सरकारने काही मागण्या मान्य केल्या असल्या तरी राज्य शासनात एसटीचे विलीनीकरण करा ही एकच मागणी घेऊन कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरु आहे. त्यावरून आता उच्च न्यायालयाने लवकरात लवकर कामावर हजर होण्याचे निर्दश एसटी कर्मचार्‍यांना दिले आहे. त्यानंतरही संप मागे घेणार नाही अशी भूमिका कर्मचार्‍यांनी घेतली आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी लवकरात लवकर आपआपसात चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्‍न लावून कामावर रूजू व्हावे. अन्यथा ताब्यात घेण्यात येईल, असा कडक इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे यानंतर आता आंदोलकांची काय भूमिका असेल हे पाहावे लागणार आहे. मात्र, आज न्यायालयाच्या आदेशानंतर देखील संप मागे घेणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचार्‍यांनी घेतली.
दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणात आपण राज्य सरकारला आदेश देऊ असे सांगितले. न्यायालयाच्या आदेशानंतरही एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर आजही तोडगा निघाला नाही. त्यामुळे उद्या मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा होणार सुनावणी होणार आहे.

COMMENTS