प्रभागातील विकास कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडणे नगरसेवकांचे आद्य कर्तव्य – आ.संग्राम जगताप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रभागातील विकास कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडणे नगरसेवकांचे आद्य कर्तव्य – आ.संग्राम जगताप

नगर -  केवळ पद मिळवणे हे लक्ष्य नसावे, तर मिळालेल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी करणे आपल्या प्रभागात काय कामे झाली, काय होणार आहेत याचा लेखा

दिवाळीच्या औचित्याने घराघरात पोहोचण्यासाठी भावी नगरसेवकांचा खटाटोप
ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण… महापौरांच्या प्रभागात पाण्याचे संकट
शिवसेनेला मोठा धक्का ! नवी मुंबईतील 32 माजी नगरसेवक शिंदे गटात.

नगर – 

केवळ पद मिळवणे हे लक्ष्य नसावे, तर मिळालेल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी करणे आपल्या प्रभागात काय कामे झाली, काय होणार आहेत याचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडणे हे नगरसेवकांचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

     प्रभाग क्र.2 मधील चारही नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांच्या अहवालाचे प्रकाशन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, संभाजी पवार, नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके, महेश सातपुते आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होतेे.

     आ.संग्राम जगताप पुढे म्हणाले, प्रभाग 2 च्या नगरसेवकांनी दिवाळी- पाडवा मुहुर्तावर नागरिकांना प्रभागातील केलेल्या विकास कामांची माहिती शुभेच्छांसह अहवालाद्वारे दिली. हा स्त्युत्य उपक्रम आहे. निवडणुकीत तर कोणीही मोठ-मोठी पत्रके छापून कामे दाखवतात,पण प्रभाग 2 च्या नगरसेवकांनी या माध्यमातून केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवली. निवडणुक नसतांना त्यांनी जनतेसमोर विकासाचा लेखा-जोखा मांडला. याचा आदर्श इतर नगरसेवकांनी घ्यावा, असे आ.जगताप यांनी सांगितले.

     माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले, आम्ही चारही नगरसेवक विकासासाठी एकत्रित काम करतो. भौगोलिकदृष्टया हा प्रभाग खुप मोठा आहे. एका भागात केलेले काम दुसर्‍या भागातील लोकांना माहिती होत नाही. तेव्हा प्रत्येक भागात केलेल्या कामांचा लेखा-जोखा दिवाळी-पाडवा मुहूर्तावर नागरिकांना शुभेच्छासह अहवालात मांडला.  तसेच या विकास कामांसाठी आ.संग्राम जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असल्याचे ते म्हणाले.

     नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके यांनी यावेळी सांगितले की, केवळ मतदान मागतांना केलेली कामे सांगणे हे ध्येय नसावे. आम्ही काय करतो, कोणती कामे झाली, कोणती कामे होणार आहे यांची माहिती जनतेला देणे हे आमचे कर्तव्य समजतो.

     माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यावेळी म्हणाले, प्रभाग मोठा आहे. तरीही चारही सेवक सेवा म्हणून प्रत्येक भागात दक्ष राहतो, त्यामुळे नागरिकही आमच्याकडे विश्वासाने कामे सांगतात ती पुर्णत्वास नेतो. याचे वेगळं समाधान मिळते. आ.संग्राम जगताप यांच्या विकास निधीतून चांगली कामे या भागात झाल्यामुळे चांगला विकास होत असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS