शेत रस्ते मिळवून देण्याकरीता पुढाकार… भाऊबीजच्या दिवशी चळवळीची सुरुवात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेत रस्ते मिळवून देण्याकरीता पुढाकार… भाऊबीजच्या दिवशी चळवळीची सुरुवात

अहमदनगर (प्रतिनिधी)-  शेतकर्‍यांना शेती कसण्यासाठी आणि जाण्या-येण्यासाठी शेत रस्ते मिळवून देण्याकरीता शेत रस्ता साम भूदान चळवळीसाठी पीपल्स हेल्पला

शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना | LOKNews24
महिला…कुटुंबाच्या आधारवड
Shrirampur : शेततळ्यात बुडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू (Video)

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

शेतकर्‍यांना शेती कसण्यासाठी आणि जाण्या-येण्यासाठी शेत रस्ते मिळवून देण्याकरीता शेत रस्ता साम भूदान चळवळीसाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. या चळवळीची सुरुवात मिरी (ता. पाथर्डी) गावातील शंकरवाडी महसूल शिवारातून भाऊबीजच्या दिवशी केली जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी दिली. आहे.  

परिसर न्यायालयाच्या माध्यमातून सर्व शेतकर्‍यांना एकत्र आणून तडजोडीने शेतरस्त्यांचे प्रश्‍न निकाली काढण्यात येणार आहे. या चळवळीसाठी मिरी येथील नेते डॉ. यशवंतराव गवळी, राहुल गवळी, दशरथ खोसे, बापू झाडे, सोपान वेताळ, पोपट खोसे, ज्ञानदेव काळे यांनी पुढाकार घेतला आहे.

शंकरवाडी शिवारातील महाडिक कुटुंबाला गट नंबर 176 मध्ये जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे कोर्टकचेर्‍या सुरू आहेत.बहीण आणि भाऊ यांच्यामधील हा वाद आहे. हा वाद दिवाळीच्या भाऊबीजेच्या मुहूर्तावर समन्वयाने चर्चेतून सोडविण्यासाठी परिसर न्यायालय काम करणार आहे. या चळवळीतून पुन्हा बहीण-भावा मध्ये सलोखा निर्माण होऊन शेत रस्त्याचा प्रश्‍न सुटू शकणार आहे. अशाच पध्दतीने जिल्ह्यातील शेत रस्त्यांसाठी ही चळवळ सक्रीय राहणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यानंतर विनोबा भावे यांनी भूदान चळवळ चालवली आणि त्यातून लाखो एकर जमीन दीन-दुबळ्या घटकांना वाटण्यात आली. भूदान चळवळीला एक पाऊल पुढे नेऊन संघटनेच्या वतीने साम भूदान चळवळ सुरू करण्यात आली आहे. अनेक शेतांना रस्ते नसल्याने त्या जमीनी पडून आहेत. या माध्यमातून सामंजस्याने आणि तडजोडीने रस्त्यांसाठी जमीन उपलब्ध होऊ शकते. यामुळे शेतकर्‍यांना चांगल्या पध्दतीने शेती करुन स्वत:चा विकास साधता येणार आहे. शेतकर्‍यांना वेगवेगळ्या मार्गाने सहकार्य करण्यासाठी शेतरस्ता भूदान चळवळ कार्य करत राहणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी सांगितले.

COMMENTS