कोपरगावात मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संपर्क कार्यालय उद्घाटन

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

कोपरगावात मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संपर्क कार्यालय उद्घाटन

कोपरगाव/ता.प्रतिनिधी : जेऊर कुंभारी येथे नामदार बाळासाहेब थोरात जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते उत्साहाच्या वातावरणात कर

मनरेगाकडून 2.30 कोटी निधी मंजूर ः आ. आशुतोष काळे
महिला शिक्षण दिनी शिक्षिकांचा झाला गौरव…
शाडू मातीच्या पर्यावरणपुरक श्रीगणेशाचे चौकात बनविलेल्या कुंडात विसर्जन

कोपरगाव/ता.प्रतिनिधी : जेऊर कुंभारी येथे नामदार बाळासाहेब थोरात जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले तदनंतर कोपरगाव मधील कृष्णाई मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी झाले. यावेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्ष नवीन सभासद नोंदणी अभियानाचे शुभारंभ करण्यात आला.
आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी तरुणांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा केली व रोजगाराची हमी देत सर्व प्रश्‍नांना प्राधान्य देवून त्यावर उपाय योजना केल्या जाण्याचे आश्‍वासन दिले. नुकत्याच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या व कमी कालावधीत जनसामान्यांचा विश्‍वास संपादन केलेले युवा नेते आकाश नागरे यांनी देखील गावोगावी भेटी देऊन आलेले स्व-अनुभव तसेच तरुणांना भेडसावणारे प्रश्‍न मांडले व समस्यांवर उपाय योजना करण्याची श्री. तांबे यांना विनंती केली. रविंद्र साबळे व सौ. सविता विधाते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी काँगेस पक्षात प्रवेश केला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या सूचनेनुसार आकाश नागरे यांची कोपरगाव तालुका काँग्रेस सभासद नोंदणी अभियान प्रमुख म्हणुन निवड जाहीर केली. गावो गावी तरूणांना, महिलांना, व ज्येष्ठ नागरिकांना भेटून काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी नवीन मतदारांना पक्षासोबत जोडण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे. यावेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, श्री साईबाबा संस्थान शिर्डी चे विश्‍वस्त सचिन गुजर, अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष. सुभाष सांगळे ,अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस श्रीमती. मिनलताई खांबेकर, जिल्हाध्यक्षा (महिला, अ.जा. विभाग) सविताताई विधाते, अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष तुषार पोटे, तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष , सुनील साळुंखे, शहरध्यक्ष अ.जा. विभाग रवींद्र साबळे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पर्बत यांनी केले.

COMMENTS