धक्कदायक…एकाच घरातील तिघांनी विष घेऊन केली आत्महत्या (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कदायक…एकाच घरातील तिघांनी विष घेऊन केली आत्महत्या (Video)

 नवी मुंबईतील वाशी येथे एकाच घरातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली  आहे . वाशी सेक्टर 4 येथील माऊली सोसायटी मध्ये राहणाऱ्या मोहिन

मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या
मुलांना विष देत जोडप्याची आत्महत्या
कामाच्या तणावातून अभियंत्याची आत्महत्या

 नवी मुंबईतील वाशी येथे एकाच घरातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली  आहे . वाशी सेक्टर 4 येथील माऊली सोसायटी मध्ये राहणाऱ्या मोहिनी कामवानी वय 87, कांता कामवानी वय 63 व दिलीप कामवानी वय 67 या तिघांनी आत्महत्या केली. राहत्या घरी विष प्राशन करून आई, मुलगा व मुलगी यांनी आत्महत्या केली . 29 तारखेला सकाळी त्यांनी विष प्राशन केले होते. यासंदर्भातील माहीती वाशी पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ तिघांनाही महानगरपालिका  रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान तिघांचाही मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून आर्थिक अडचणीमुळे कामवानी कुटुंबीय नैराश्येत होते. या नैराश्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS