ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागणार

मुंबई : आधीच आर्थिक खोलात असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे मोठा आर्थिक भुर्दंड बसत असल्यामुळे एसटीने तिकीटांच

मलायका अरोरा-अर्जुन कपूरचा यांचा ब्रेकअप ?
कोरोनामुळं मृत झालेल्यांना भरपाई अशक्य l DAINIK LOKMNTHAN
राहुरी कृषि विद्यापीठाच्या तीन पुस्तकांचे दिल्लीच्या कार्यक्रमात विमोचन

मुंबई : आधीच आर्थिक खोलात असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे मोठा आर्थिक भुर्दंड बसत असल्यामुळे एसटीने तिकीटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंधन दरवाढीमुळे एसटीला प्रचंड तोटा होत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी एसटीच्या तिकीटाचे दर 17 टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्वात महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
भाडेवाढीसाठी राज्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय परिवहन समिती तयार करण्यात आली आहे. समितीचा अहवाल महामंडळाच्या संचालक मंडळासमोर सादर करण्यात येईल. एसटीला आतापर्यंत 12500 कोटी रुपयांचा संचित तोटा झाला आहे. याशिवाय कोट्यवधांची देणी शिल्लक आहेत. डिझेल दरात सातत्याने वाढ होत असल्याने खर्चात वाढ झाली आहे. कोरोना काळात प्रवासी संख्या घटल्याने उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे 12 तास काम करूनही कर्मचार्‍यांचे वेतन अनेकदा रखडले आहे. हकीम समितीच्या शिफारशीनुसार महागाईच्या आधारावर भाडेवाढ होत असल्याने, डिझेलचे दर दहा टक्क्यांहून अधिक वाढल्यास, टायरचे दर, कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता आणि सुटे भागांच्या दरातील वाढीच्या निकषांचा अभ्यास केला जातो. जून 2018 मध्ये करण्यात आलेली शेवटची भाडेवाढ ज्या निकषांवर करण्यात आली. त्याचाही अभ्यास केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुरु असलेल्या खनिज तेलाच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, कोळसा आणि नैसर्गिक वायूच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली आहे.

COMMENTS