राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिनी खडसे यांची भेट घेतली . यावेळी रोहित पवार यांनी माध
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिनी खडसे यांची भेट घेतली . यावेळी रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी रोहित पवार म्हणाले की,स्वतःची ताकद वाढवण्यासाठी एखाद्या मोठ्या बहुजन ओबीसी नेत्याची ताकत कमी करण्याचं काम येथील भाजप नेत्यांकडून होत आहे .त्याचा एक भाग ईडी सीबीआय आहे.महाराष्ट्रात हे फक्त राजकारण आहे .एकनाथ खडसे अशा मोठ्या नेत्यांची ताकत कमी करण्याचं काम देखील अशाच प्रकारे भाजपाकडून झाले. महा विकास आघाडीच्या नेत्यांवर देखील ईडी सीबीआयच्या कारवाया सुरू आहे . अशी घणाघाती टीका रोहित पवार यांनी गिरीश महाजन व भाजप नेत्यांवर केली आहे .
COMMENTS