Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातार्‍यातील पत्रकारांसाठी पत्रकारनगर उभारणार : खा. उदयनराजे यांची घोषणा

सातार्‍यात उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कारांचे वितरणसातारा / प्रतिनिधी : सातार्‍याच्या विकासात पत्रकारांचे योगदान आहे. त्यांच्या सुचनेमुळे अनेक प्रक

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचा विक्रम
माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
*तुमचे आजचे राशीचक्र शुक्रवार, ११ जून २०२१ l पहा LokNews24*

सातार्‍यात उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण
सातारा / प्रतिनिधी : सातार्‍याच्या विकासात पत्रकारांचे योगदान आहे. त्यांच्या सुचनेमुळे अनेक प्रकल्प मार्गी लागले. अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी सुधारणाही सुचवल्या. लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवण्याचे काम डोळस पत्रकारांनी केले आहे. सातार्‍यात पत्रकारांसाठी पत्रकार भवनाला आम्हीच जागा दिली. पत्रकार आणि आमच्यात असलेल्या बॉन्डींगला कुणाचीही दृष्ट लागू नये. ज्या प्रमाणे पोलिसांसाठी पोलीस वसाहती आहेत. त्याप्रमाणे सातार्‍यातील पत्रकारांसाठी पत्रकार नगर उभारणार, अशी घोषणा खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केली.
सातारा पालिका आणि सातारा शहर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार सोहळा 2021 पार पडला. कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस दिपक प्रभावळकर, साविआचे प्रतोद अ‍ॅड. डी. जी. बनकर प्रमुख उपस्थित होते.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, लोकप्रतिनिधींकडून काम करताना चुका होतात. किंबहुना निवडून गेल्यावर नगरसेवक, आमदार, खासदार लोकांची सेवा नीट करतात का? यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम डोळस पत्रकार करत असतात. त्यांचा सन्मान करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे पत्रकारांसाठी पुरस्कार सोहळा सुरु करण्यात आला. त्यात नगरपालिकेप्रमाणे पत्रकार संघाचेही योगदान आहे. सातार्‍यात पत्रकार भवन या त्यांच्या मागणीची पूर्तता आम्ही केली. आता शहराची हद्दवाढ झाल्यामुळे पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे. पोलिसांची सोसायटी झाली, त्याप्रमाणे त्यांच्या मागणीनुसार पत्रकारांचे पत्रकारनगर झाले पाहिजे. यासाठी आम्ही पुढाकार घेवू. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पत्रकार काम करतात. त्यांचे वास्तव्य शहरात झाले पाहिजे, असे सांगून खा. उदयनराजे म्हणाले. तुमचे निर्भीडपणे लिखाण असणे आवश्यक आहे. लोकप्रनिधींच्या चुका लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकारांचे आहे. मी तर पत्रकारांना माझे मित्र म्हणून संबोधतो. माझ्या वाटचालीत पत्रकार मित्रांचा मोठा वाटा आहे.
माझा राजकीय प्रवास नगरसेवक पदापासून झाला. मी नगराध्यक्ष कधी होवू शकलो नाही. पत्रकारांनी दाखवलेल्या चुकांमुळे आम्ही सुधारणा केली. पत्रकारांच्या सुचनेमुळे स्वच्छता कामात सुधारणा झाली. पत्रकारांशी विचारविनिमय करत अनेक कामे मार्गी लावली. सातारा पालिकेने उत्कृष्ठ पत्रकार पुरस्काराची प्रथा पाडली.
हरीष पाटणे म्हणाले, पुरस्कार प्राप्त पत्रकारांपैकी अनेकांनी तीस-तीस वर्षे पत्रकारितेत काम केले आहे. जिल्ह्यातील प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे प्रमाणिकपणे काम केले आहे. थोरले प्रतापसिंह महाराज अत्यंत वाचनप्रिय होते. सातारा शहरातील पेठा त्यांनी वसवल्या. अत्यंत विद्वान व विद्वत्तापूर्ण असे त्यांचे व्यक्तिमत्व होतं. म्हणून त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय आम्ही घेतला. या पुरस्काराची उंची एवढी वाढली आहे की पुरस्कारासाठी अनेकांचे फोन आले. एकावर्षी सगळ्यांना पुरस्कार देता येत नाही. संबंधितांच्या कार्याची दखल निकषांच्या आधारे घेतली जाईल. देशात अनेक संघटना, पक्ष, संस्था आहेत. मात्र पत्रकारांना स्वत:ची सत्ता असलेल्या नगरपालिकेमार्फत पुरस्कार प्रदान करण्यासाठी मेहनत घेणारे व स्वत:हून पुढाकार घेणारे देशातील एकमेव खासदार उदयनराजे भोसले हेच असतील.
विनोद कुलकर्णी म्हणाले, दरवर्षी पत्रकार पुरस्कार दिले जातात पण दोन वर्षे कोरोनामुळे पुरस्कार कार्यक्रम घेतला आला नाही. खा. उदयनराजे भोसले यांनी योग्यवेळी मनोज शेंडे यांची उपनगराध्यक्षपदी निवड केली. या पुरस्कार सोहळ्यामुळे काहीजणांना पोटदुखीही झाली. नगरपालिकेच्या निवडणुका आल्या म्हणून पुरस्कार दिले, उदयनराजेंनी पत्रकारांना आमीष दाखवले, असे काहीजण बोलू लागले. उदयनराजेंना आमीष दाखवण्याची गरज नाही आणि सातार्‍यातील पत्रकार इतके कर्तबगार आहेत की ते कुठल्याही आमीषावर काम करत नाहीत. निवड समितीवर पारदर्शकपणे आमची निवड करुन योग्य पत्रकारांना पुरस्कार द्या, असा आग्रह उदयनराजेंनी आमच्याकडे धरला. दरवर्षी हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. युट्यूब, फेसबुक, सोशल मिडियामुळे सर्व स्वस्त झाले आहे. कुणीही शुटिंग करतंय आणि त्याखाली दोन ओळी लिहून मी पत्रकार झालो म्हणतंय. त्यांनी पत्रकारितेची व्याख्या समजून घ्यावी. सोशल मिडियाला पत्रकारितेचा दर्जा मिळालेला नाही, हे लक्षात घ्यावं. पत्रकारितेचा दर्जा टिकवण्याचं काम प्रत्येकाने केले पाहिजे.
दीपक प्रभावळकर म्हणाले, खा. उदयनराजे आणि पत्रकारांमध्ये बॉन्डींग आहे. यामध्ये आमचे जर्नालिझम किंवा त्यांचे राजकारण आडवे येत नाही. यापुढेही हे बॉन्डिंग कायम राहिल. हा गौरव घराघरात पोहोचावा. प्रास्तविक अ‍ॅड. डी. जी. बनकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार संपदा देशपांडे यांनी मानले. यावेळी सातारा शहरातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील 29 पत्रकारांना पुरस्काराने गौरवण्यात आले. सन्मानचिन्ह, धनादेश, शाल व श्रीफळ देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास सभापती सीता हादगे, स्नेहा नलावडे, अनिता घोरपडे, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, सुनील काटकर, प्रताप शिंदे आदी उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्यास तुडुंब गर्दी होती.

COMMENTS