थोरात कारखान्याकडून शेतकर्‍यांना 200 रुपये प्रतिटन अनुदान व कामगारांना 20 टक्के बोनस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थोरात कारखान्याकडून शेतकर्‍यांना 200 रुपये प्रतिटन अनुदान व कामगारांना 20 टक्के बोनस

संगमनेर ( प्रतिनिधी )  सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांवर कार्यरत असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने आर्

खंडाळा येथे आज कविसंमेलन
अनेक वर्षांचे प्रलंबित विकासाचे एक-एक प्रश्न मार्गी लागत आहे – आ.संग्राम जगताप
गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी द्या

संगमनेर ( प्रतिनिधी ) 

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांवर कार्यरत असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने आर्थिक मंदी व कोरोनाच्या संकटातही शेतकरी, सभासद व कामगारांना मदतीची आपली उवल परंपरा कायम राखत यावर्षी दिवाळी निमित्त कामगारांना 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. तसेच कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 200 रुपये प्रतिटन प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती रायाचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याच्या 55 व्या गळित हंगाम शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रतापराव ओहोळ होते. तर व्यासपीठावर आ.डॉ.सुधीर तांबे,सौ.दुर्गाताई तांबे,बाजीराव पा.खेमनर,अ‍ॅड.माधवराव कानवडे,रणजितसिंह देशमुख,इंद्रजितभाऊ थोरात, लक्ष्मणराव कुटे, गणपतराव सांगळे,शंकर पा.खेमनर,उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक चंद्रकांत कडलग,रमेश गुंजाळ,रोहिदास पवार,मिनानाथ वर्पे,संपतराव गोडगे,इंद्रजित खेमनर, अभिजीत ढोले, भास्करराव आरोटे, भाऊसाहेब शिंदे, दादासाहेब कुटे,तुषार दिघे,विनोद हासे,अनिल काळे, माणिक यादव, संभाजी वाकचौरे, मंदाताई वाघ,मिराबाई वर्पे,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदि मान्यवर उपस्थित होते.

ना.थोरात म्हणाले कि, कारखान्याचा प्रत्येक हंगाम हा आव्हानात्मक असतो. चांगल्या व प्रामाणिक भावनेतून केलेल्या कामाला सातत्याने परमेश्‍वराचा आशिर्वाद मिळत आहे. कारखान्याने सभासद व ऊस उत्पादकांचा विश्‍वास जपला आहे. कार्यक्षेत्रात 14 लाख मे.टन ऊस निर्माण झाला तर कायम रायातील सर्वोच्च भाव या कारखान्याचा असेल. दिपावली निमित्त कामगारांना 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान तसेच कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांना 200 रुपये प्रतिटन प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.तसेच सभासदांना 15 किलो मोफत साखर मिळणार आहे. अमृत उद्योग समूहातील सर्व संस्था रायात आग्रगण्य आहेत. इंजि.कॉलेजला एक्सलेंट दर्जा मिळाला असून एस.एम.बी.टी सेवाभावी संस्थेने रायातील सर्वोत्कृष्ट हॉस्पीटल निर्माण केले आहे. या ठिकाणी टाटा संलग्नेतून नविन कॅन्सर हॉस्पीटल उभे राहत आहे. गोरगरिबांची मोठी सेवा केली जात आहे. कोरोना काळात ग्रामीण रुग्णालयात एस.एम.बी.टी चे 40 सेवक रात्र दिवस काम करत होते. रायात मोठी जबाबदारी असली तरी आई असलेल्या संगमनेरला आपण कधीही विसरत नाही. दिवाळी ही आनंदाची असून दुध संघ ही सर्व उत्पादकांना गोड बातमी देणार आहे. मनातील राग,द्वेष बाजूला ठेवून सर्वांनी कोरोनाचे नियम पाळून दिवाळी आनंदात करा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

शेतकरी व कामगारांचे हित जोपासणार्‍या या कारखान्यांने या वर्षीही महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, इंद्रजितभाऊ थोरात व सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक जग्गनाथ घुगरकर यांनी ही परंपरा कायम ठेवली असून हे काम रायातील सर्व कारखान्यासाठी आदर्शवत ठरणारे आहे. 20 टक्के बोनस व 30 दिवसांचा सानुग्रह अनुदान व कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 200 रुपये प्रतिटन प्रोत्साहनपर अनुदान आणि सभासदांना मोफत 15 किलो साखर मिळणार असल्याने सर्व शेतकरी,ऊस उत्पादक,सभासद,कर्मचारी आणि संगमनेरमधील व्यापारी वर्गातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS