शहर वाहतूक पोलिसांच्या भुमिकेमुळे अपघात वाढले – आप्पासाहेब जाधव

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहर वाहतूक पोलिसांच्या भुमिकेमुळे अपघात वाढले – आप्पासाहेब जाधव

माजलगाव:  शहरातील रस्त्यावर आडवी - तिडवी वाहने लावणे, तसेच फेरीवाले विक्रेत्यांचे गाडे, यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी होत आहे, या वाहतुकीच्या अडथ

Beed : माजलगाव नगराध्यक्ष यांची बदनामी करणाऱ्या वर कारवाई करा ! (Video)
Beed : माजलगाव धरण ओव्ह्यरफ्लो (Video)
Majalgaon : आझाद नगर येथील मूलभूत प्रश्नवार सलीम बापू आक्रमक (Video)

माजलगाव: 

शहरातील रस्त्यावर आडवी – तिडवी वाहने लावणे, तसेच फेरीवाले विक्रेत्यांचे गाडे, यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी होत आहे, या वाहतुकीच्या अडथळ्यांमुळे वाहतुकीला शिस्त न राहता अपघातांचे प्रमाण वाढले आहे, अशावेळी शहर वाहतूक पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे अपघातात वाढ झाली असल्याचे मत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांनी व्यक्त केले.

माजलगाव शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते, अशा परिस्थितीत कुठल्याही प्रकारची शिस्त लावण्याचे योग्य पद्धतीचे प्रयत्न शहर वाहतूक पोलीस करताना दिसत नाहीत, शहरांमध्ये भर रस्त्यामध्ये दोनचाकी, तीन चाकी, चार चाकी वहाने फेरीवाल्यांच्या गाड्या उभ्या असतात, या रस्त्यावरील बेशिस्तपणाकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करतात, शहरामध्ये पेट्रोलिंगच्या नावाखाली बिनकामाच्या चकरा मारतात आणि शासनाचे डिझेल जाळतात, अपघात मात्र घडतात निष्पाप लोकांचा बळी जातो.

अशीच अपघाताची घटना बीड रोड माजलगाव येथे घडली असून  पात्रुडचा रहिवासी बाबू रहेमान आतार हा ३५ वर्षांचा तरूण  शहरांमध्ये रोड ओलांडताना अपघात झाला, रूग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला असता रस्त्यातच प्राणज्योत मावळली. या अपघातात शहर वाहतूक पोलिस जबाबदार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सांगितले.

COMMENTS