परभणी, : सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव रस्त्यावरील एका शेतातील आखाड्यावर आयपीएलवर सट्टा लावणार्या सट्टेबाजांवर पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने छा
परभणी, :
सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव रस्त्यावरील एका शेतातील आखाड्यावर आयपीएलवर सट्टा लावणार्या सट्टेबाजांवर पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून 96 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, सेलू पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या आखाड्यावर काही व्यक्ती आयपीएलवर सट्टा लावत असल्याची माहिती कळाल्याबरोबर पोलिस उपनिरीक्षक विश्वास खोले, कर्मचारी अझहर पटेल, सय्यद जाकेर, दीपक मुदीराज, मुंढे यांच्या पथकाने मंगळवारी (दि.12) दुपारी छापा टाकला. केलेल्या कारवाईतून 26 हजार 350 रुपये रोख व अन्य मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक साईनाथ अनमोड यांनी दिलेल्या तक्रारीतून सुधीर शेट्टी, दीपक निवळकर, संदीप लहाणे, विशाल दहिवाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करीत आहेत.
नांदेड – पनवेल एक्सप्रेस काही दिवस रद्द
परभणी, : सोलापूर विभागातील भालवानी ते वाशिंबे दरम्यान 26.33 किलोमीटरचे दुहेरीकरणाचे कार्य पूर्ण करण्याकरिता नॉन इंटर लॉक वर्किंग हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने काही रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. यापैकी नांदेड विभागातुन धावणारी पनवेल एक्स्प्रेस काही दिवस रद्द करण्यात आली आहे, असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने दिली.
गाडी संख्या 07614 नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस ही हुजूर साहिब नांदेड येथून निघणारी पनवेल एक्स्प्रेस 14 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोब, 2021 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर गाडी संख्या 07613 पनवेल ते नांदेड एक्स्प्रेस ही पनवेल येथून निघणारी पनवेल एक्स्प्रेस 15 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती नांदेडच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे.
COMMENTS