शेतकरी कुटुंबीयांची जमीन बळकावण्याचा नगरसेवकाचा प्रयत्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी कुटुंबीयांची जमीन बळकावण्याचा नगरसेवकाचा प्रयत्न

अहमदनगर (प्रतिनिधी)-  नगर औरंगाबाद रोड अकबर नगर येथील अमीर मळा येथील रहिवासी हयात खान दिलावर पठाण, अयुब खान दिलावर पठाण, बशीर खान दिलावर पठाण शाहर

महिलेचा पाठलाग करून गैरवर्तन, गुन्हा दाखल
कुकडीच्या आर्वतनातून पाणी विसापूर धरणात सोडा
मालिकांच्या राजीनाम्यासाठी अहमदनगरमध्ये भाजपचे आंदोलन | LOKNews24

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

नगर औरंगाबाद रोड अकबर नगर येथील अमीर मळा येथील रहिवासी हयात खान दिलावर पठाण, अयुब खान दिलावर पठाण, बशीर खान दिलावर पठाण शाहरुख पठाण यांच्या स्वतःची वडीलोपर्जित शेत जमीन असून त्या जमिनीमधून १२ एकर ताबा घेण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक माझी सभागृहनेते मुदस्सर जहांगीर शेख व त्यांचे साथीदार घरी येऊन जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न करत असल्यास त्या निषेधार्थ त्यांच्यावर योग्यशीर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले

यावेळी हयातखान दिलावर पठाण, अयुबखान दिलावर पठाण, बशीरखान दिलावर पठाण, शाहरुख पठाण, गुलाम पठाण, निसार पठाण, जावेद पठाण, आरिफ पठाण, राजू शेख, सलमान पठाण आदी उपस्थित होते.                                               

नगर औरंगाबाद रोडला लागून बुरानगर हद्दीत गट नंबर २९/१, २९/२, ३०/१, ३०/२, ३०/३, ३०/४, ही वडिलोपार्जित शेत मिळकत आहे  व आमचे चुलते रुस्तम खान आमिर खान पठाण यांनी त्यांच्या हद्दीतील त्यांची  जमीन विकून बनावट कागदपत्र करून आमच्या जागेचेही मोठे क्षेत्र विकले ते शेत्र शेवट मयत गोकुळ शिवलाल गांधी यांनी विकत घेतले म्हणून माझे मयत वडील दिलावर खान यांनी दिवाणी न्यायालयात वाटपासाठी दावा दाखल केला हा दावा निकाल आमच्या बाजूनेच लागलेला आहे व सदर वाटपासाठी व ताब्यासाठी तहसीलदार नगर यांच्याकडे प्रलंबित आहे 

असे असताना गुंड व नगरसेवक मुदस्सर जहांगीर शेख यांनी त्यांच्या साथीदारांसह आमच्या राहत्या घरी येऊन त्यांचा व आमचा कोणताही संबंध नसताना ताबा घेण्यासाठी येणार आहे व मी सागर गांधी यांच्याकडून जमीन विकत घेतलेली आहेत असेच म्हणतो व १२ एकर शेती द्या नाही तर मी शेतीत जबरदस्तीने शिरून ताबा घेईल व एका एकाला मारण्याची धमकी दिली वास्तविक मुदस्सर जहांगीर शेख यांचा आमच्या मिळकतीची कोणताही संबंध नसतानाही 6 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी आमच्या घरी त्यांचे दोन साथीदार सह मुदस्सर जहांगीर शेख हे अर्धा तास आम्हाला दम देऊन धमकावण्याचा व जमिनीचा ताबा जबरदस्तीने घेतो व त्यामध्ये कोण काय करतो बघतो अशी धमकी आम्हाला दिली 

म्हणून आम्ही भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार अर्ज दिला परंतु पोलिसांनी एनसी नोंदवून घेतली असून नगरसेवक मुदस्सर जहांगीर शेख हे त्यांच्या पदाचा गैरवापर करून जबरदस्तीने आमची जमिनीचा ताबा मागत आहे म्हणून त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल होऊन तसेच घरात घुसून दादागिरी करत असून गुन्हा दाखल करण्याची मागणी सदर कुटुंबीयांनी केली आहे सदर मुदस्सर जहांगीर शेख यांनी  त्यांची गॅंग तयार करून तो त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून लॅण्ड माफिया जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहे  त्यांच्यावर बरेच गुन्हे आहेत तसेच तो आमची मिळकत लाटण्याचा  प्रकार करत असून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पठाण कुटुंबियांनी केली आहे.

COMMENTS