सोनई- ( प्रतिनिधी) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्षे भाविकांसाठी शनिदर्शन बंद होते. बंद असलेले शनि मंदीर आज पासून खुले होत असुन, म
सोनई- ( प्रतिनिधी)
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्षे भाविकांसाठी शनिदर्शन बंद होते. बंद असलेले शनि मंदीर आज पासून खुले होत असुन, मात्र शासकिय नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे, गेल्या दीड ते दोन वर्षा पासून मंदीर बंद असल्याने भाविकांची संख्या नसल्याने छोटे मोठे व्यवसाईकाचे प्रचंड हाल होत होते .
हातावर पोट असलेल्या वर उपासमारीची वेळ आली होती.त्यामुळे रोजगाराचा प्रश निर्माण झाला होता, घटस्थापनेच्या दिवशी पहाटेच्या आरती नंतर शनि मंदीर सुरु होत आहे. मात्र जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार स्वयभू शनि मुर्तीला स्पर्श नको असल्याने सर्व भाविकांना चौथऱ्या खालूनच दर्शन घेण्याची सक्ती केली आहे.
अन्य नियमांचा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विश्वस्त मंडळास दिल्या आहेत. शिडीत घेतलेल्या बैठकिला शनैशवर देवस्थानाचे अध्यक्ष भागवत बानकर ,कार्यकारी अधिकारी जी .के. दरदले उपस्थित होते. करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
गेल्या दीड ते दोन वर्षा पासून देवस्थान बंद असल्याने येथील व्यवसाईकाना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागले होते जरी देवस्थान सुरू झाले असले तरी करोना नियमांचे पालन काटेकोरपणे करावे लागणार आहे.भाविक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
COMMENTS