हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात मागील आठवड्यापासून झालेल्या मुसळधार पावसाने अतिवृष्टी झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाची मोठी हाणि झाल
हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात मागील आठवड्यापासून झालेल्या मुसळधार पावसाने अतिवृष्टी झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाची मोठी हाणि झाल्याने शेतकरी हतबल झाला असून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत पूरग्रस्त भागाची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे मतदारसंघात हाहाकार झाला असल्याने शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत मदत मिळावी यासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मुंबई गाठत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन मतदार संघाचे अपडेट देऊन मदतीची मागणी केली. आमदार जवळगावकर यांनी हदगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेटी देऊन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.पूरग्रस्तांची पाहणी करत असताना आमदार माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले की मतदार संघातील हजारो हेक्टर जमिनी पाण्याखाली जाऊन खरडून गेल्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना सावरण्याची वेळ असून मतदार संघातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळवून देण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न करणार असल्याचेही आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी बोलताना सांगितले.
COMMENTS