रावसाहेब दानवेंच्या सभेत पत्रकबाजी… धनगर आरक्षणावरून युवकांनी विचारला जाब

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रावसाहेब दानवेंच्या सभेत पत्रकबाजी… धनगर आरक्षणावरून युवकांनी विचारला जाब

गंगाखेड : प्रतिनिधी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या गंगाखेड येथील सभेत काही युवकांनी धनगर आरक्षणाचे काय झालं ? अशी ठळक अक्षराची

बांगलादेशचे खासदार भारतातून बेपत्त्ता
रामोजी ग्रुपचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन
चालत्या बाईकवर तरुणाला विषारी साप चावला

गंगाखेड : प्रतिनिधी

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या गंगाखेड येथील सभेत काही युवकांनी धनगर आरक्षणाचे काय झालं ? अशी ठळक अक्षराची  पत्रके वाटून व जाबही विचारला.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री  दानवे हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी च्या निमित्ताने  रविवारी सकाळी गंगाखेडात  आले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष डाँ.सुभाष कदम   यांच्या निवासस्थानासमोर छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

या सभेत मंत्री दानवे बोलत असताना धनगर समाजाच्या युवकांनी  धनगर आरक्षणाचा काय झालं असा प्रश्न उपस्थित केला. मंत्री दानवे यांच्यासहित उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांना पत्रके वाटण्यात आली. 

हा दौरा पिक नुकसानीची पाहणीसाठी असून धनगर आरक्षणासाठी मुद्दाम दौरा काढून तुम्हाला भेटायला देऊ असे उत्तर मंत्री दानवे यांनी दिले. धनगर समाजाचे कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर, मुंजाभाऊ लांडे यांनी समाजाच्या  वतीने हे निवेदन पत्रके देण्यात आली. यावेळी ह भ प शिवाजी महाराज बोबडे, मुंजाभाऊ कूगणे, लक्ष्मण देवकते, आनंदराव बनसोडे, आश्रुबा करवर ,शिवाजी करवर ,मनोहर मुलगिर , सय्यद मुदस्सीर, शेख सोहेल, उपाडे उपस्थित होते.

COMMENTS