श्रीरामपुर ते नेवासा रस्त्याचे काम सुरु न केल्यास पुढील आठवड्यात माजी आ. मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपुर ते नेवासा रस्त्याचे काम सुरु न केल्यास पुढील आठवड्यात माजी आ. मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको

श्रीरामपूर - प्रतिनिधी श्रीरामपूर ते नेवासा या रस्त्याची दुर्दशा झाली असून तातडीने खड्डे बुजवून डागडूजी करावी, अशा मागणीचे निवेदन गावोगावच्या ग‘ाम

कामाला लागा : आमदार सुधीर तांबे यांची कार्यकर्त्यांना सूचना
नेवासा तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरून काढणार : ना. शंकरराव गडाख
पत्रकार संजय वाघ यांच्या वरील गुन्ह्याचा तपास सी. आय .डी. कडे द्यावा

श्रीरामपूर – प्रतिनिधी

श्रीरामपूर ते नेवासा या रस्त्याची दुर्दशा झाली असून तातडीने खड्डे बुजवून डागडूजी करावी, अशा मागणीचे निवेदन गावोगावच्या ग‘ामस्थांनी देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप कामास सुरुवात केलेली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात सदरचे काम सुरु न केल्यास रस्त्याच्या लाभधारक ग‘ामस्थांच्या वतीने माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली एक दिवस एक गाव पध्दतीने श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर रास्तारोको आंदोलन सुरु केले जाईल, असा इशारा लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ यांनी दिला आहे.

यासंदर्भात माहिती देतांना श्री.धुमाळ यांनी सांगितले की, श्रीरामपूर ते नेवासा या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. सदर रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे, अन्यथा माजी आ.श्री.मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोके करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन अशोकनगर फाटा, वडाळामहादेव, खोकर, भोकर, टाकळीभान, बेलपिंपळगाव, पाचेगाव, पुनतगाव येथील ग‘ामस्थांनी श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी श्री.अनिल पवार, तहसीलदार श्री.प्रशांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना दिले होते.

निवेदन देवून आठ दिवस झाले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने ग‘ामस्थांच्या निवेदनाची दखल घेऊन कामास प्रत्यक्ष सुरुवात केलेली नाही. यामुळे संबंधित रस्त्याशी निगडीत गावांच्या नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आता पाऊस उघडला असल्याने रस्त्याच्या डागडूजीचे काम सुरु करण्यास कोणतीही अडचण नाही. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या आठ दिवसात सदरच्या रस्त्याचे दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात सुरु करावे. 

तसे न केल्यास माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली दररोज एक दिवस एक गाव याप्रमाणे पुढील आठवड्यात श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशारा ज्ञानदेव साळुंके, दत्तात्रय नाईक, मंजाबापु थोरात, संतोष (कान्हा) खंडागळे, सुनिल बोडखे, रावसाहेब मगर, एकनाथ लेलकर, दिगंबर शिंदे, सखाराम कांगुणे, बाबासाहेब कोकणे, कुंडलीक सरोदे, विलास सरोदे, खंडेराव सरोदे, वसंतराव शेरकर, मच्छिंद्र वाकचौरे, हनुमंतराव वाकचौरे, सुदर्शन वाकचौरे, अशोकराव वाकचौरे, भगवंत काळे, संजय गंधारे, रघुनाथ वाकचौरे, फकिरा वरुडे, तुकाराम पागीरे, दिगंबर नांदे, भागवतराव पवार, दिगंबर तुवर, रमेश राजगुरु, तुकाराम घोगरे, सुनिल शिंगोटे, सिताराम तुवर, समशुद्दीन शेख, शकील पटेल, पुंजाहरी शिंदे, माणिकराव शिंदे, महेश पटारे, भागवतराव पटारे, अण्णासाहेब चौधरी, सुरेश अमोलिक, नामदेव तागड, आबासाहेब काळे, राहुल अभंग, बाळासाहेब विधाटे, पंढरीनाथ मते, पोपटराव जाधव, बाबासाहेब काळे, राम पटारे, दीपक काळे, पंढरीनाथ पटारे, माणिकराव पवार, रामभाऊ कासार, अमोल पवार, उद्धव आहेर, अल्ताफखान पठाण, प्रफु‘ पवार, बापुसाहेब गायकवाड, बाबासाहेब पवार आदींनी दिला आहे.

COMMENTS