मँचेस्टरची खुर्ची होतेय व्हायरल..

Homeताज्या बातम्यादेश

मँचेस्टरची खुर्ची होतेय व्हायरल..

वेब टीम : लंडन मराठी माणसाने अटकेपार झेंडे रोवले हे वाक्य महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांनी ऐकले आहे. इतिहासातील या पराक्रमाची प्रेरणा घेत अनेक मराठी

तरुणीवर सामूहिक बलात्कार | DAINIK LOKMNTHAN
टेलीग्राम अ‍ॅपच्या सीईओंना अटक
सिद्धिविनायक मंदिरच्या अध्यक्षपदी आमदार सदा सरवणकर

वेब टीम : लंडन

मराठी माणसाने अटकेपार झेंडे रोवले हे वाक्य महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांनी ऐकले आहे. इतिहासातील या पराक्रमाची प्रेरणा घेत अनेक मराठी माणसांनी साता समुद्रापार परदेशातही आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली. 

सध्या सोशल मीडियावर सांगलीचे बाळू लोखंडे यांची चर्चा सुरू आहे. मात्र, ही चर्चा वेगळ्या कारणांनी सुरू आहे. बाळू लोखंडे यांची लोखंडी खुर्ची मँचेस्टर येथील एका रेस्टोरंटबाहेर दिसून आली. 

सांगलीतील ही खुर्ची इंग्लंडमध्ये गेली कशी, याबाबत नेटकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता लागली आहे. ज्येष्ठ पत्रकार सुनंदन लेले यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. 

सुनंदन लेले हे मँनेस्टरमधील अल्ट्रिक्म भागात फिरत असताना त्यांना एका रेस्टोरंटच्या परिसरात एक लोखंडी खुर्ची दिसली. ही खुर्ची पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला असल्याचे लेले यांनी सांगितले. 

या खुर्चीच्या मागे ‘बाळू लोखंडे, सावळज’ असं मराठीत लिहिण्यात आले होते. त्यामुळे चक्क मराठी माणसाची खुर्ची इंग्लंडमध्ये कशी पोहचली, याबाबत नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

COMMENTS