‘छगन भुजबळ ‘ओबीसी आरक्षण’, ‘ओबीसी आरक्षण’, असे ओरडत फिरतात… मात्र सरकार असूनही काही करू शकले नाही

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘छगन भुजबळ ‘ओबीसी आरक्षण’, ‘ओबीसी आरक्षण’, असे ओरडत फिरतात… मात्र सरकार असूनही काही करू शकले नाही

प्रतिनिधी : जळगाव मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जळगाव येथे ओबीसी हक्क परिषदेत बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीक

गावबंदी करणार्‍याला तुरुंगात पाठवा : ना. भुजबळांनी सांगितली कायद्यातील तरतूद
व्यापारी संकुलातील गाळे वाटपाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करावी मंत्री छगन भुजबळ
उत्तम आरोग्य, ग्रंथ वाचन व सुसंवाद ही आंनदी आयुष्याची त्रिसूत्र – छगन भुजबळ      

प्रतिनिधी : जळगाव

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जळगाव येथे ओबीसी हक्क परिषदेत बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेवर भाजपा नेते गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे. 

‘छगन भुजबळ ‘ओबीसी आरक्षण’, ‘ओबीसी आरक्षण’, असे सारखे ओरडत फिरतात. त्यांची सरकार असतानाही ते काही करू शकले नाही. आरक्षणाबाबत भुजबळांची दुटप्पी भूमिका आहे, असा आरोप महाजन यांनी केला आहे.

गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले की, ”ओबीसींच्याबाबतीत नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भूमिका अतिशय स्पष्ट होती. 

तसेच नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ओबीसींबाबत राज्यभर फिरून आपली भूमिका मंडळी. त्यांनी याआधीही असेच मराठा आरक्षणाचे तीनतेरा वाजवले आणि आता ओबीसी आरक्षणाचे तीनतेरा वाजवत आहे. 

आता थातुर मातुर इकडे तिकडे फिरून लोकांची दिशाभूल करत आहेत. या महाविकास आघाडी सरकारलाच आरक्षण नको आहे. या सरकारमध्ये कुठेही ताळमेळ नाही, यामुळेच ओबीसी समाजावर ही परिस्थिती ओढवली. त्यांनी उगाच नाटके करण्यापेक्षा कारवाई करावी.”

तसेच, गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावरही निशाणा साधला. ”राज्यातील हे सरकार राम भरोसे सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, किरीट सोमय्यांबाबत (Kirit Somaiya) निर्णय झाला माहीत नाही, तर नारायण राणे (Narayan Rane) यांच्या बाबतीत निर्णय झाला, 

हे गृहमंत्री यांना माहीत नाही. सरकार कोण चालवतो, हेच कळत नाही. त्यांच्या सर्व कारभार राम भरोसे सुरू आहे.” अशी टीका गिरीश महाजन यांनी यावेळी केली.

COMMENTS