शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन ) आमदार राम सातपुते यांनी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानत मुंबईमधील सहकारी आरोग्य सेवक समाधान पाटील यांना संपर्क
शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
आमदार राम सातपुते यांनी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानत मुंबईमधील सहकारी आरोग्य सेवक समाधान पाटील यांना संपर्क साधून रवींद्र ननवरे यांच्या विषयी सविस्तर माहिती दिली व समाधान पाटील यांच्या मदतीने ननवरे यांच्यावर मुंबई येथील रिलायन्स रुग्णालयमध्ये गुडघ्यावर मोफत यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली.
नातेपुते येथील ननवरे यांना गुडघ्याचा गंभीर आजार झाला होता. त्यांना चालायला प्रचंड त्रास होत होता. शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन ते तीन लाख रुपये खर्च होता. मात्र परिस्थिती बिकट असल्याने शस्त्रक्रिया करणे अशक्य होते. नातेपुते शहरातील भाजपा अध्यक्ष भैय्या चांगण यांची रवींद्र ननवरे यांनी भेट घेऊन आजाराविषयी व खर्चाविषयी माहिती दिली.
चांगण यांनी आ. सातपुते यांची रवींद्र ननवरे यांना घेऊन भेट घेतली व शस्त्रक्रिये विषयी येणाऱ्या खर्चा बाबत माहिती दिली. आ. सातपुते यांच्या सांगण्यावरुन ननवरे यांच्यावर मुंबई येथील रिलायन्स रुग्णालयमध्ये गुडघ्यावर मोफत यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर आ. राम सातपुते यांनी मुंबई येथे रिलायन्स हॉस्पिटल मध्ये जाऊन रुग्ण रवींद्र नानावरे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. यावेळी रवींद्र ननवरे व कुटुंबीयांनी आ. राम सातपुते, नातेपुते भाजपा शहराध्यक्ष भैयासाहेब चांगण, आरोग्य सेवक समाधान पाटील यांचे आभार मानले.
COMMENTS