महसूल अधिकाऱ्यांनी  देव  मामलेदारांसारखे  काम करावे -विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महसूल अधिकाऱ्यांनी देव मामलेदारांसारखे काम करावे -विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक प्रतिनिधी  महसूल विभागात  काम करतांना बागलाणच्या देव मामलेदार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महसूल अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन व

सगळ्या निवडणूक प्रक्रियेची थट्टा करून टाकली आहे… राज ठाकरेंचा घणाघात
विद्युत भवनात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
Nashik : बापरे ! सांडपाण्यात वाहून गेला अन् नाल्याच्या जाळीत अडकला… (Video)

नाशिक प्रतिनिधी 

महसूल विभागात  काम करतांना बागलाणच्या देव मामलेदार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महसूल अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. नाशिक विभागातील सर्व उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्या अर्धन्यायिक आणि दंडाधिकारी कामकाजाबाबत सुसूत्रता आणण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी  ते बोलत होते.

महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांना लोकाभिमुख व प्रभावीपणे  अर्धन्यायिक व दंडाधिकारी कामकाज करण्यासाठी कायद्याचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असून प्रकरणाची कार्यकक्षा व गुणवत्ता यांचा विचार करून कायद्याच्या कसोटीवर टिकणारे न्यायनिर्णय पारित करावेत. सामान्य लोकांना आपल्या प्रकरणी न्याय्य पद्धतीने सुनावणी होऊन न्याय मिळाल्याची भावना जो पर्यंत रुजविली जात नाही, तो पर्यंत कायद्याचे खरे पालन झाले आहे, असे म्हणता येणार नाही, असेही मत श्री.गमे यांनी व्यक्त केले.

नाशिक विभागातील सर्व महसूल अधिकारी यांनी पारित केलेल्या विविध न्याय निर्णयांचे परीक्षण व तपासणी करण्याची कार्यपद्धती लवकरच अंमलात आणण्यात येणार असून नाशिक विभागातील या तपासणी कार्यप्रणालीमुळे महसूल अधिकारी अधिक जबाबदारी व संवेदनशील पद्धतीने कामकाज करतील, अशी  आशा  त्यांनी यावेळी व्यक्त  केली.

दोन दिवस चालणाऱ्या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी प्रल्हाद कचरे, वरिष्ठ उपजिल्हाधिकारी कुंदनकुमार सोनवणे, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे आणि उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांनी जमीन प्रकरणे, जमीन विषयक कायद्यात अलीकडच्या काळात झालेले बदल आणि दंडाधिकारी कामकाज यासह विविध कायदेशीर विषयांबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उपस्थित उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे निरसन यावेळी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी केले. या कार्यशाळेसाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसिलदार या प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित राहणार आहेत.  

  याप्रसंगी नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त गोरक्ष गाडीलकर, प्रवीण देवरे, अर्जुन चिखले आणि विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या संचालक गीतांजली बाविस्कर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन उपजिल्हाधिकारी तथा प्रबंधक अरुण आनंदकर यांनी  केले.

COMMENTS