महिला पोलिसांना मोठा दिलासा… राज्यात कामाच्या वेळेत कपात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला पोलिसांना मोठा दिलासा… राज्यात कामाच्या वेळेत कपात

प्रतिनिधी : मुंबई राज्यातील ठाकरे सरकारने महिला पोलिसांच्या कर्तव्याची वेळ कमी केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिला पोलिसांसाठी ड्यु

पोलिस प्रशासनासह प्रसार माध्यमांनी दाखविली चुणूक;आंदोलनकर्त्यांनी मानले आभार !
वाळूतस्करांनी पोलीस कॉन्स्टेबलला टेम्पोखाली चिरडले (Video)
जनतेच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असणार्‍या पोलिस दलास कोरोना संरक्षणासाठी मास्क व सॅनीटायझरचे वाटप

प्रतिनिधी : मुंबई

राज्यातील ठाकरे सरकारने महिला पोलिसांच्या कर्तव्याची वेळ कमी केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिला पोलिसांसाठी ड्युटीचे तास खूप जास्त होते. 

त्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना कारवा लागत होता. ठाकरे सरकारने महिला पोलिसांच्या या समस्या पाहता त्यांची ड्युटी चार तासांनी कमी केली आहे.

ठाकरे सरकारकडून महिला पोलिसांबाबत (Women police) मोठा निर्णय घेण्यात आला आहे . आता महिला पोलिसांचे कामाचे तास 

12 वरून कमी करून 8 तास करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे  (Sanjay Pandey) यांनी दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून महिला पोलिसांच्या कामाची वेळ कमी करण्याबाबत चर्चा सुरु होत्या . ठाकरे सरकारच्या पुढाकाराने अखेर याबाबत र निर्णय घेण्यात आला आहे. 

त्यामुळे महिला पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .मात्र दुसरीकडे पुरुष पोलिसांच्या कामाच्या वेळांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाही .

COMMENTS