ऊपोषणास बसलेल्या २२ ऊपोषणकर्त्या पैकी 11 जणांची  प्रकृती खालावली (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऊपोषणास बसलेल्या २२ ऊपोषणकर्त्या पैकी 11 जणांची प्रकृती खालावली (Video)

केज तालुक्यातील लाडेगाव प्रकरणी सर्व पक्षीय दलित संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या बॅनरखाली सर्व प

त्या बिल्डर्स विरोधात गुन्हा दाखल करा -मोहित कंबोज | LOKNews24
फायद्यासाठी पक्ष बदलणार्‍या नाईकांना जनता थारा देणार नाही : सम्राट महाडीक
विषबाधा करून जीवे मारण्याचा प्रयत्न


केज तालुक्यातील लाडेगाव प्रकरणी सर्व पक्षीय दलित संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या बॅनरखाली सर्व पक्षीय आमरण उपोषण गेली तीन दिवसापासून केज तहसील च्या समोर सुरू केले आहे. गेल्या  दोन ते तिन वर्षापासून लाडेगाव येथील बौध्द समाज शासकीय गायरान प्रकरणी व  पोटाची खळगी भरण्यासाठी अन्यायाचे चटके सहन करत आहे.

याची दया मात्र कोणालाही न आल्याने अखेर सर्व दलित संघटना, पक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येवुन या अन्यायाच्या विरोधात दलित अन्याय अत्याचार निर्मुलन समीतीच्या बँनरखाली सर्वपक्षीय आमरण उपोषण गेल्या दोन दिवसापासून केज तहसीलच्या समोर सुरू केले आहे. मात्र या ठिकाणचे लोकप्रतिनिधीना  त्यांना साधे भेटण्यासाठी वेळ नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. केज तालुक्यातील लाडेगाव येथील गायरान प्रश्नी मागील दोन दिवसा पासून उपोषणाला बसलेल्या २२ उपोषणार्थीच्या तब्येतीची उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष मुळे यांनी आरोग्याची तपासणी केली. .

तपासणीत एकूण उपोषणार्थी पैकी 11 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून त्यापैकी 2 जणांची प्रकृति चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचारासाठी भरती होण्याच्या सल्ला दिला. असून या ठिकाणी दलित नागरिक यांच्यात लोक प्रतिनिधी विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.

COMMENTS