‘रंगलेल्या गालाचा मुका’ प्रवीण दरेकरांना भोवला… पोलिसांत तक्रार दाखल…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘रंगलेल्या गालाचा मुका’ प्रवीण दरेकरांना भोवला… पोलिसांत तक्रार दाखल…

प्रतिनिधी : पुणे लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित केल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी पुण्यात बोलताना असभ्य भाषेत टीक

आमदार आशुतोष काळेंनी केलेल्या नियोजनातून रुग्णसंख्या नियंत्रणात येईल: नामदार हसन मुश्रीफ
राज्यात लम्पीने 32 जनावरांचा मृत्यू : मंत्री विखे
शेकडो युवक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रतिनिधी : पुणे

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित केल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी पुण्यात बोलताना असभ्य भाषेत टीका केली होती. 

त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष असल्याची टीका केली होती. या टीकेवर राष्ट्रवादीने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. 

या पक्षाला गरीबांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याचीही टीका त्यांनी केली होती.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांना राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष असल्याची टीका भोवली आहे. 

आता त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)यांनी तक्रार दाखल केली आहे. 

काही दिवसांपूर्वी दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर महिलांबाबत केलेल्या वक्तव्याविषयी त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

या वक्तव्याविरोधात रुपाली चाकणकर यांनी आक्रमक भुमिका घेत दरेकरांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. 

त्यांनी माफी मागावी अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.त्यानंतर चाकणकरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “प्रवीण दरेकर तुम्ही जनाची नाही तर मनाची लाज राखून महिला भगिनींची माफी मागायला हवी. 

कायद्याच्या चौकटीत राहून आम्हा महिलांना न्याय मिळेल या उद्देशाने याबाबत मी पुण्यात FIR दखल केले आहे.” असे ट्विट करत त्या म्हणाल्या आहेत.

COMMENTS