Homeताज्या बातम्या

गजानन विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; विविध मान्यवरांची उपस्थिती

नवगण राजुरी: येथील गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्

एकजुटीची ताकद दाखवा; ३० जूनच्या महामोर्चात सहभागी व्हा – पुरुषोत्तम (गोटू) वीर
प्रशासनाचा ’कागदी’ उत्सव नि अन्यायाचा ’अदृश्य’ आक्रोश! किनवटमध्ये ’महसूल सप्ताहा’ची आतषबाजी; पण सामान्यांच्या पदरी लालफितीचा आणि लाचखोरीचा अंधार!
मुंबईला मिळणार नवे मंत्रालय; एअर इंडियाच्या इमारतीतून चालणार सरकार

नवगण राजुरी: येथील गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पवळ हे होते.

यावेळी प्रथम विद्येची देवता श्री सरस्वती माता व संस्थेच्या संस्थापिका माजी खासदार स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकवृंदांचे सत्कार व स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी मुख्य वक्ते अमृतस्वामी महाराज यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. त्यांनी गुरु-शिष्यांच्या विविध समर्पक उदाहरणांच्या माध्यमातून उपस्थितांना गुरुपौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिले. तसेच शाळेचे पर्यवेक्षक दगडे व्ही. एन. व श्रीमती संगिता शिंदे यांनीही विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत मौलिक मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात बोलताना मुख्याध्यापक प्रशांत पवळ यांनी नमूद केले की, आपल्या आयुष्यात अनेक गुरूंचा सहभाग असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपले जीवन सुखमय व यशस्वी होते. गुरूंच्या प्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच गुरुपौर्णिमेचा हा उत्सव साजरा केला जातो. ज्यांच्या दूरदृष्टीमुळे आपली व या संस्थेची जडणघडण झाली, अशा स्व. केशरकाकू यांच्या प्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

COMMENTS