Homeताज्या बातम्या

एचपीव्ही लसीकरणाबाबत आरोग्य विभागाची जनजागृती मोहीम; ‘एचपीव्ही लस मी घेतली, आपणही घ्या..!’ विद्यार्थिनींचे आवाहन

केज: महिलांमध्ये आढळणार्‍या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात ये

अॅमेझॉनला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू जॅसी यांना आवाहन
बीडमध्ये स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन; राजर्षी शाहू कन्या विद्यालय व राजमाता इंग्लिश स्कूलचा संयुक्त उपक्रम
कोयना धरणाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ नामकरण; महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय

केज: महिलांमध्ये आढळणार्‍या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या लसीबाबत लाभार्थी व पालकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने आडस येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रम आयोजित केला.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल मुंडे यांनी एचपीव्ही लसीचे महत्त्व, तिचे फायदे आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी लसीकरणाची आवश्यकता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनी व पालकांच्या मनातील गैरसमज दूर करून पात्र मुलींनी वेळेत लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.

डॉ. मुंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कु. अक्षरा संतोष राजमाने, लक्ष्मी अशोक केकाण व जान्हवी मुरलीधर काळे या विद्यार्थिनींनी एचपीव्ही लसीकरण करून घेतले. यानंतर “एचपीव्ही लस मी घेतली, आपणही घ्या..!” असा संदेश देत त्यांनी इतर तरुणींनाही लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास आडस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव सांगळे, डॉ. अजय थोरात, आरोग्य सहाय्यिका आर. बी. मुंडे, महानंदा खरात, पी. एन. सोनवणे, आरोग्य सहाय्यक विलास कोल्हे, गटप्रवर्तक कविता गव्हाणे तसेच आशा कार्यकर्त्या अर्चना साबळे, निता चव्हाण, अर्चना भालेकर, परवीन शेख, जयश्री कोकाटे व मनिषा उबाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

COMMENTS