Homeताज्या बातम्या

पारनेरकर महाराजांच्या जन्मतिथीनिमित्त पूर्णवादी बँकेचा रक्तदानाचा महायज्ञ; २५ शाखांमध्ये ३६७ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

बीड: प. पू. पूर्णवाद प्रणेते डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर आणि प. पू. पूर्णवाद वर्धिष्णू डॉ. विष्णु महाराज पारनेरकर यांच्या जन्मतिथीनिमित्त पूर्णव

उपेक्षेच्या गर्तेत दरसांगवीचे आरोग्य उपकेंद्र; कागदावर आरोग्यसेवा, प्रत्यक्षात प्रशासकीय अनास्थेचे उघडे प्रदर्शन!
राहुरी-शनिशिंगणापूर प्रस्तावित रेल्वेमार्गाविरोधात शेतकरी आक्रमक! कृती समिती स्थापन करणार; आ. प्राजक्त तनपुरे करणार नेतृत्व
एचपीव्ही लसीकरणाबाबत आरोग्य विभागाची जनजागृती मोहीम; ‘एचपीव्ही लस मी घेतली, आपणही घ्या..!’ विद्यार्थिनींचे आवाहन

बीड: प. पू. पूर्णवाद प्रणेते डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर आणि प. पू. पूर्णवाद वर्धिष्णू डॉ. विष्णु महाराज पारनेरकर यांच्या जन्मतिथीनिमित्त पूर्णवादी नागरिक सहकारी बँक, बीडच्या वतीने राज्यभरातील २५ शाखांमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. २७ आणि २९ जुलै २०२६ रोजी पार पडलेल्या या उपक्रमात ग्राहक, सभासद, हितचिंतक, कर्मचारी तसेच पूर्णवाद परिवारातील शिष्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या शिबिरात एकूण ३६७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

छत्रपती संभाजीनगर येथील जालना रोड शाखेतील शिबिराचे उद्घाटन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण तथा दुग्धव्यवसाय विकास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झाले. सातारा परिसर शाखेतील शिबिराचे उद्घाटन महापौर समीर राजूरकर, तर जालना शाखेतील शिबिराचे उद्घाटन मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांगारकर यांनी केले.

२९ जुलै रोजी बीड येथील तीन शाखांच्या संयुक्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी हरिष धार्मिक आणि जिल्हा उपनिबंधक सतीश तोटावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचाही कार्यक्रम पार पडला. इतर सर्व शाखांमध्येही विविध स्थानिक मान्यवरांच्या हस्ते शिबिरांचे उद्घाटन झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प. पू. डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर, प. पू. डॉ. विष्णु महाराज पारनेरकर आणि भारतमाता यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष जोशी, संचालक सुहास तेंडुलकर, विश्वनाथ माणुसमारे, इंजि. महादेव हुलजुते, ॲड. अमित देशपांडे, डॉ. सुरेंद्र कलंत्री, डॉ. विवेक पालवनकर, जयश्री रायते, विश्वंभर थिगळे, प्रा. ज्योतीश्वर भालेराव आणि सुमुख गोविंदपूरकर यांनी विविध शाखांमध्ये उपस्थित राहून शिबिरांचे उद्घाटन केले तसेच स्वतः रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.

या जीवनदायी उपक्रमासाठी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष जोशी, उपाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर, संचालक ॲड. अमित देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी, डेप्युटी सीईओ प्रल्हाद राजुरीकर आणि सरव्यवस्थापक महेश पारगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले असून सर्व रक्तदाते, रक्तपेढ्यांचे प्रतिनिधी व नागरिकांचे आभार मानण्यात आले आहेत.

COMMENTS