Homeताज्या बातम्या

चीनचा भारताच्या सीमेवर नवा डाव! LAC जवळ १२ अत्याधुनिक J-20 स्टील्थ लढाऊ विमानं तैनात; सॅटेलाईट फोटोंमुळे खळबळ

बीजिंग: चीन भारताविरोधात लष्करी पातळीवर मोठ्या आणि संशयास्पद हालचाली करत असल्याची धक्कादायक माहिती उपग्रह (सॅटेलाईट) फोटोंसह समोर आली आहे. चीनने

HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
जमीन वादातून धमक्यांना वैतागून शेतकऱ्याची आत्महत्या; मोबाईल व्हिडिओमुळे भांडाफोड, दोघांवर गुन्हा दाखल
नवापूर एमआयडीसी टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; ८ ते १० कोटींची मालमत्ता जळून खाक; प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न
India China Border | चीनची कुरघोडी : भारताजवळ तैनात केले ११ स्टील्थ फायटर  जेट जे-२०

बीजिंग: चीन भारताविरोधात लष्करी पातळीवर मोठ्या आणि संशयास्पद हालचाली करत असल्याची धक्कादायक माहिती उपग्रह (सॅटेलाईट) फोटोंसह समोर आली आहे. चीनने भारतीय सीमेच्या अगदी जवळ असलेल्या आपल्या दोन प्रमुख हवाई तळांवर किमान १२ अत्याधुनिक ‘J-20’ (मायटी ड्रॅगन) स्टील्थ लढाऊ विमानं तैनात केली आहेत. गेल्या काही वर्षांचा विचार करता, चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) जवळ पाचव्या पिढीतील लढाऊ विमानं इतक्या मोठ्या संख्येने तैनात करण्याची ही पहिलीच वेळ असून, ही सर्व विमानं भारताच्या दिशेने तैनात करण्यात आली आहेत.

कमर्शियल सॅटेलाईट कंपनी ‘वेंटोर’ने (Ventor) चिनी लढाऊ विमानांचे हे ताजे फोटो टिपले आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सने (PLAAF) शिनजियांग प्रांतातील ‘होटन’ आणि तिबेटमधील ‘डॅम्सुंग’ (डॅक्सुंग) या हवाई तळांवर ही अत्याधुनिक लढाऊ विमानं उभी केल्याचे या फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे.

काय आहे J-20 ‘मायटी ड्रॅगन’ची वैशिष्ट्ये?

चीनच्या हवाई ताफ्यात समाविष्ट असलेले J-20 ‘मायटी ड्रॅगन’ हे पाचव्या पिढीतील (5th Generation) अत्यंत घातक आणि अत्याधुनिक स्टील्थ लढाऊ विमान आहे. या विमानांची निर्मिती ‘चेंगडु एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन’ने केली आहे. ही विमानं शत्रूच्या रडार यंत्रणेला सहज चकवा देतात. यामध्ये दूरवर अचूक मारा करणारी क्षेपणास्त्रं आणि अत्याधुनिक इन्फ्रारेड सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. शत्रूच्या देशात अत्यंत गुप्तपणे घुसून हल्ला करण्याची आणि सुरक्षित परतण्याची क्षमता या विमानांमध्ये आहे.

कुठे अन् कशी झालीय तैनाती?

  • होटन हवाई तळ (शिनजियांग): वेंटोरने जारी केलेल्या फोटोंनुसार, होटन एअरबेसवर आठ J-20 विमाने दिसून येत आहेत. उत्तर लडाखमधील भारताच्या ‘दौलत बेग ओल्डी’ (DBO) या फॉरवर्ड एअरबेसपासून होटन एअरबेस अवघ्या २४५ किलोमीटरवर, तर लेहपासून ३८९ किलोमीटर अंतरावर आहे.
  • डॅम्सुंग/डॅक्सुंग हवाई तळ (तिबेट): २५ जून रोजीच्या सॅटेलाईट फोटोंनुसार, तिबेटच्या ल्हासा जवळील डॅक्सुंग एअरबेसवर सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या कव्हरखाली आणखी ४ J-20 विमानं तैनात असल्याचे दिसत आहे. हा एअरबेस अरुणाचल प्रदेशातील तवांगपासून केवळ ३४४ किलोमीटर अंतरावर आहे.

दोन्ही हवाई तळांवर मिळून किमान १२ ‘J-20’ स्टील्थ लढाऊ विमानं तैनात करण्यात आल्याने भारतीय सीमेवरील सुरक्षेच्या दृष्टीने आणि संरक्षण वर्तुळात ही मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे. चीनच्या या अचानक वाढलेल्या हालचालींवर भारतीय सैन्याची आणि हवाई दलाची बारीक नजर आहे.

COMMENTS