Homeताज्या बातम्या

ग्रामीण भागातील गुणवंतांचा गौरव समाजाला प्रेरणा देणारा; ऍड. शिवाजीराव काकडे यांचे बोधेगाव येथे प्रतिपादन

शेवगाव: बोधेगावसारख्या ग्रामीण भागातील युवकांमध्ये शिक्षण, क्रीडा व विविध स्पर्धात्मक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करण्याची जिद्द आणि क्षमत

आ.भीमराव केराम यांचे नीलकंठ कातले व प्रकाश कुडमते हेच अधिकृत स्वीय सहाय्यक; अनधिकृत दाव्यांमुळे होणारा संभ्रम टाळण्याचे आवाहन
वर्षभर दडपलेली फाईल अखेर उघडली; सुनील मोरे प्रकरणात मुख्याध्यापक पवळे यांच्यावर विभागीय चौकशी
शाळांना निधी नाही, पण पोलीस अधीक्षक निवासस्थान दुरुस्तीसाठी ९३ लाखांचा खर्च; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर डॉ. गणेश ढवळे यांचा सवाल

शेवगाव: बोधेगावसारख्या ग्रामीण भागातील युवकांमध्ये शिक्षण, क्रीडा व विविध स्पर्धात्मक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करण्याची जिद्द आणि क्षमता आहे. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत हे विद्यार्थी आज यशाची शिखरे गाठत असल्याने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन यशाचा गौरव केल्याने समाजात सकारात्मक आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण होण्यास निश्चितच हातभार लागणार असल्याचे प्रतिपादन आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ऍड. शिवाजीराव काकडे यांनी केले.

तालुक्यातील बोधेगाव येथील शेतकरी कुटुंबातील गायत्री सावता सुसे हिने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे. तिने ७२० पैकी ५७० गुण मिळवत ओबीसी प्रवर्गातून ऑल इंडिया रँक ११,२१० मिळवली आहे. याबद्दल आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसी, बोधेगाव यांच्या वतीने कु. गायत्री सुसे हिचा विशेष सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ऍड. काकडे बोलत होते.

या प्रसंगी माणिक गर्जे, भारत लांडे, सावता सुसे, राजेंद्र भांगरे, श्रीकृष्ण निकम, कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फसले, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत गांगुर्डे, राजेश मोकाटे, राजेंद्र फलके, सुनील पडोळे, ईश्वर वाबळे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS