Homeताज्या बातम्या

कोपरगावात शेळीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात; पशुपालनातून उत्पन्नवाढीचे मार्गदर्शन

कोपरगाव : लोकनेते सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ लिमिटेड, कोपरगाव येथे नुकतीच दोन दिवसीय शेळीपालन व कुक्कुटपालन विषयक प्रशिक्षण कार्य

लाईनमनच्या मनमानीमुळे शेतकर्‍यांचे हाल; स्वखर्चातून घेतलेला डीपीही अर्धवट
नंदुरबारमध्ये बर्ड फ्लूचा मोठा प्रादुर्भाव; पोल्ट्री व्यवसाय संकटात!, प्रशासन हायअलर्टवर!
लाईनमनच्या मनमानीमुळे शेतकर्‍यांचे हाल; स्वखर्चातून घेतलेला डीपीही अर्धवट

कोपरगाव : लोकनेते सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ लिमिटेड, कोपरगाव येथे नुकतीच दोन दिवसीय शेळीपालन व कुक्कुटपालन विषयक प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. पारंपरिक शेतीसोबत पशुपालन व कृषी पूरक उद्योगांचा अवलंब करून शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्नात वाढ कशी साधावी, याबाबत या कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणात दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन, पशुखाद्य व्यवस्थापन, जनावरांचे आरोग्य, लसीकरण, रोगप्रतिबंधक उपाययोजना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पशुपालनावर आधारित उद्योग उभारणी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. मार्गदर्शक जयंत कांबळीकर यांनी पशुपालन क्षेत्रातील आधुनिक संधी, कृषी उद्योगातील नव्या व्यवसाय कल्पना आणि स्वयंपूर्ण उद्योजक घडविण्याबाबत मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी कोपरगाव, निफाड, सिन्नर, येवला आणि वैजापूर तालुक्यातील अनेक नवोद्योजक व प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. लोकनेते सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ लिमिटेडचे चेअरमन अंबादास देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली. यासाठी संस्थेचे ढवळे, एडीसीसी बँकेचे व्यवस्थापक, अनिकेत देशमुख, ॲड. जयश्री, वैभव बंदावणे तसेच कोपरगाव मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष अरुण कदम यांनी सहकार्य केले.

COMMENTS