बीड: ताल साधना म्युझिक सर्कलच्या वतीने भाजप राष्ट्रीय सचिव मा. ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जाहीर झालेल्या ’सन्मान गौरव पुर

बीड: ताल साधना म्युझिक सर्कलच्या वतीने भाजप राष्ट्रीय सचिव मा. ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जाहीर झालेल्या ’सन्मान गौरव पुरस्कारांचा’ वितरण सोहळा रविवारी, २६ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा दिमाखदार सोहळा सायंकाळी ६ वाजता बीड येथील के. एस. के. महाविद्यालय सभागृहात पार पडणार आहे.
या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध समर्थभक्त मा. श्री. विशाल महाराज रामदासी उपस्थित राहणार आहेत. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. दिपताई क्षीरसागर, सारिकाताई क्षीरसागर, डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि संतोष मानूरकर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.
या मान्यवरांचा होणार विशेष गौरव:
- उद्धव शास्त्री घाडगे – संस्कृत विद्या रत्न पुरस्कार
- डॉ. शुभम कुलकर्णी – म्युझिक थेरपी जीवन गौरव पुरस्कार
- प्रा. चिन्मय पुजारी – वाणी भूषण पुरस्कार
- प्रा. कृष्णा रामदासी – श्री समर्थ वेद सेवा पुरस्कार
- सौ. अनुराधाताई चिंचोलकर – नृत्य संस्कृती रक्षक पुरस्कार
- कु. गार्गी कुलकर्णी – राज्यस्तरीय स्पर्धेत विजय मिळवून भारताचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल विशेष सन्मान
या भव्य गौरव सोहळ्याला बीड जिल्ह्यातील नागरिक, कलावंत आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकाश मानूरकर, संजय पाटील देवळाणकर, अभिषेक लोळगे आणि सौ. पल्लवी कीर्तिकर यांनी संस्थेच्या वतीने केले आहे.

COMMENTS