बीड: कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ च्या कलम १२ अंतर्गत दाखल करण्यात आलेला अर्ज बीड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्याया

बीड: कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ च्या कलम १२ अंतर्गत दाखल करण्यात आलेला अर्ज बीड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने खर्चासह नामंजूर केला आहे.
या प्रकरणात पीडित महिलेने २४ जून २०२१ रोजी गैरअर्जदाराविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये तक्रार दाखल केली होती. अर्जदार व गैरअर्जदार हे बीड शहरातील एका महाविद्यालयात तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि १ सप्टेंबर २०१३ रोजी हिंदू धर्मपद्धतीनुसार मंदिरात विवाह झाल्याचा दावा अर्जदाराने केला होता. अर्जदाराने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात गैरअर्जदाराकडून मानसिक व शारीरिक त्रास, दुसरे लग्न, मारहाण तसेच हुंड्याच्या मागणीसह विविध आरोप केले होते. तसेच स्वतःसह मुलीसाठी पोटगी व औषधोपचाराचा खर्च मिळावा, अशी मागणी केली होती.
या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून पुरावे सादर करण्यात आले. अर्जदार व गैरअर्जदार यांच्या बाजूने एकूण चार साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बीड यांनी गैरअर्जदाराच्या बाजूने सादर करण्यात आलेले पुरावे, युक्तिवाद तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचा विचार करून अर्जदाराचा कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दाखल अर्ज खर्चासह नामंजूर केला.
या प्रकरणात गैरअर्जदाराच्या वतीने ॲड. राहुल दिलीप सोळंके यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. शेख फारुख व ॲड. तेजस वडमारे यांनी सहकार्य केले.

COMMENTS