पाटोदा: तालुक्यातील दासखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होऊन दोन वर्षांहून अधिक कालावधी लोटला असला, तरी येथील आरोग्य सेवा अद्यापही सुरळीत झा

पाटोदा: तालुक्यातील दासखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होऊन दोन वर्षांहून अधिक कालावधी लोटला असला, तरी येथील आरोग्य सेवा अद्यापही सुरळीत झालेली नसल्याची गंभीर तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त असतानाही प्रत्यक्षात एकच वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
याशिवाय, आरोग्य केंद्र सकाळी वेळेवर सुरू होत नसल्याने उपचारासाठी येणार्या रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असून अनेकांना उपचार न घेताच माघारी फिरावे लागत असल्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकार्यांच्या या मनमानी कारभाराबाबत ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांनी यापूर्वीही तालुका आरोग्य अधिकार्यांकडे अनेक वेळा लेखी व तोंडी स्वरूपात तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यानंतरही आरोग्य केंद्राच्या कारभारात आणि कामकाजात कोणतीही सुधारणा झालेली नाही. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा मिळणे अत्यंत आवश्यक असताना अशा प्रकारची गंभीर दिरंगाई होत आहे. त्यामुळे बीड जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित वैद्यकीय अधिकार्यांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, अशी जोरदार मागणी दासखेड येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

COMMENTS